Home > हेल्थ > भारतात कोरोनावरील लस तयार

भारतात कोरोनावरील लस तयार

भारतात कोरोनावरील लस तयार
X

भारतात कोरोनावरील लस तयार, मानवी चाचणीला परवानगी

संपूर्ण जगभरात 5 लाखांच्या आसपास बळी घेणाऱ्या कोरोनाच्या विषाणूला रोखणारी लस तयार करण्यासाठी संपूर्ण जगभरात प्रयत्न सुरू आहेत. पण आता यात भारतानेही मोठी आघाडी घेतली आहे.

हैदराबादमधील भारत बायोटेक या कंपनीने COVAXIN नावाची लस तयार केल्याचा दावा केलाय. ही लस तयार करण्यात केंद्र सरकारच्या ICMR आणि NATIONAL INSTITUTE OF VIROLOGY या संस्थांचाही सहभाग असल्याचं भारत बायोटेकने सांगितले आहे.

हे ही वाचा

राज्यात Unlock 2.0 ची घोषणा

‘सत्तेत आल्यावर सर्व स्वस्त होइल’ म्हणणाऱ्यां केंद्र सरकारचं वागणं विपरीत – यशोमती ठाकूर

लॉकडाऊन आणि गोंधळ वाढलं

आता या लसीच्या मानवी चाचणीला CDSCO म्हणजेच राष्ट्रीय औषध नियंत्रण विभागाने परवानगी दिलेली आहे. दोन टप्प्यांमध्ये या लसीची मानवी चाचणी केला जाणार आहे. प्राथमिक चाचण्यांमध्ये या लसीचे चांगले परिणाम दिसून आल्याचे भारत बायोटक कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एल्ला यांनी सांगितले आहे.

जुलैपासून या लसीच्या मानवी चाचणीला सुरूवात होणार आहे. भारत बायोटकेने याआधी रेबीज, चिकुनगुनिया, झिका, पोलीओ यासारख्या आजारांवरही औषधं शोधण्याच महत्त्ताची भूमिका निभावली आहे.

Updated : 30 Jun 2020 2:33 AM GMT
Next Story
Share it
Top