Home > हेल्थ > new coronavirus : आरोग्यमंत्रालयाच्या SOP मधील हे 5 मुद्दे तुम्हाला माहिती आहेत का?

new coronavirus : आरोग्यमंत्रालयाच्या SOP मधील हे 5 मुद्दे तुम्हाला माहिती आहेत का?

new coronavirus : आरोग्यमंत्रालयाच्या SOP मधील हे 5 मुद्दे तुम्हाला माहिती आहेत का?
X

ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हायरसमुळे जगभर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यामुळे भारत सरकार अलर्ट झालं असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची त्यावर तातडीची बैठकही झाली. सरकार अलर्ट असून आरोग्य मंत्रालयाने नवी नियमावलीही जारी केली आहे. यासंदर्भा काय केलं पाहिजे त्यासाठी सरकारने SOPही जाही केली आहे. या नव्या निमांमुळे ब्रिटन आणि युरोपातून येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षेसाठी अनेक नियमांचं पालन करावं लागणार आहे.

काय आहेत हे नवे नियम?

1) ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावरच RT आणि PCR टेस्ट करण आवश्यक

2) पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांना एका वेगळ्या आयसोलेशन युनिटमध्ये ठेवण्यात येणार

3) रुग्णांची 14 दिवसांनंतरची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्यानंतरच्या दोन चाचण्या निगेटिव्ह येईपर्यंत त्यांच्यावर उपचार केले जाणार

4) विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानात बसण्याआधीच या नियमांची माहिती देणे अनिवार्य

5) RT आणि PCR टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्या प्रवाशांना घरीच क्वारंटाइन रहाणे बंधनकारक

हा नवा व्हायरस हा जास्त पसरणारा असला तरी तो जिवघेणा नाही आणि त्याच्यासंदर्भात आणखी स्पष्टपणे कळालेलं नाही असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

Updated : 23 Dec 2020 5:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top