Home > हेल्थ > लढाई ऍनिमिया विरुद्ध...

लढाई ऍनिमिया विरुद्ध...

लढाई ऍनिमिया विरुद्ध...
X

खरंतर आजारपण म्हंटल की अनेकांना घाम फुटलो. आपल्याला या सगळ्यापासून दूर राहायचं असेल तर आपल्यालाच आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल.. अनेक आजार तर असे असतात की त्यांची आपल्याला माहिती नसते व त्यामुळे लोक त्याला गांभीर्याने घेत नाहीत. आणि मग याच दुर्लक्षामुळे याचे मोठे परिणाम आपल्याला भोगावे लागतात.. असे कोणते आजार आहेत? ते होऊ नये म्हणून काय काजळी घ्यावी लागते? असे प्रश्न आता तुमच्या मनात घोघावत आतील तर या सगळ्याची माहिती आता आपल्याला होमिओपॅथ डॉ.वैष्णवी देवेंद्र किराड देणार आहेत.. तर आज आपण या लेखातून ऍनिमिया या आजाराविषयी पाहणार आहोत..ऍनिमिया : रक्ताचा लालपणा कमी होण्याला ऍनिमिया म्हणतात. याला रक्तक्षय किंवा रक्तपांढरी असे ही बोलले जाते. रक्तातील लालपणा वाढवण्यासाठी रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवणे गरजेचे असते, व हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोहाची आवश्यकता असते. आपल्या शरीरात हिमोग्लोबीन लाल रक्तकणात असते, त्याचे काम छातीतून शरीराच्या विविध भागात प्राणवायु पोहचवण्याचे काम करते.

ऍनिमिया हा महिला , पुरुष व बालक यापैकी कोणालाही होऊ शकतो. पोषक आहार व योग्य उपचार घेतल्याने ऍनिमिया वरती सहज मात करता येते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घेतला पाहिजे, व पालेभाज्या युक्त आहार घेणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षण नुसार (2019-21) ची आकडेवारी :

मुले 6-59 महीने (67%)

15-19 वर्षाच्या किशोरवयीन मुली (59%)

किशोरवयीन मुले 15-19 वर्ष (31%)

किशोरवयीन मुली 15-49 स्त्रिया (57%)

गर्भवती स्त्रियां (52%)
तसेच देशातील 15 वर्षा खालील साधारणपणे 46% मुली या ऍनिमिया ने ग्रासलेल्या आहेत. व भारतातील 6 पैकी 1 महिलेचा मृत्यू हा ऍनिमिया मुळें होतो ही गंभीर गोष्ट आहे. आपल्या आरोग्य क्षेत्रात मोठे काम करणे गरजेचे आहे तरच आपण यावर मात करू शकतो. व ऍनिमिया मुक्त भारत करू शकतो.

भारत सरकारने ऍनिमिया मुक्त भारत अभियान हे देशातील ऍनिमियाचे प्रमाण लक्षात घेऊन राबविले असून युद्ध पातळीवर सरकार प्रयत्नशील आहे. सरकारकडून ऍनिमिया बरा व्हावा म्हणून व्हिटॅमिन B12 च्या गोळ्या वाटल्या जातात. ऍनिमिया मुक्त भारत करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लोकांमध्ये ऍनिमिया बद्दल जागरूकता निर्माण करणे अवशक्य आहे.

शाळेतील मुलांमध्ये ऍनिमिया आढळून येतो. ऍनिमिया बद्दल शिक्षकांना पुरेसे ज्ञान असणे गरजेचे आहे. ऍनिमियाची लक्षणे ओळखणे, मुलांना आहाराच्या विषयी ज्ञान देणे, व ज्यांना ऍनिमिया आढळून आला आहे त्यांना योग्य तो वैद्यकीय औषधोपचार मिळवून देऊन ही संख्या कमी करणे या दृष्टीने काम करणे आवश्यक आहे. बहुतांश वेळा शिक्षकांना गोळ्यांच्या बद्दल, ऍनिमिया बद्दल पुरेसे ज्ञान नसते त्या अज्ञानामुळें शालेय विद्यार्थ्यांमध्ये ऍनिमिया बळावत जातो. त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण देऊन माहिती देणे गरजेचे आहे.

बहुतांश वेळा कॅम्पला गेल्याच्या नंतर मला आढळून आलेली गंभीर गोष्ट म्हणजे सरकारने नेमून दिलेले संबंधित अधिकारी हे वैद्यकीय क्षेत्रातील नसतात. त्यांना पुरेसे ज्ञान नसते, व त्यांना ऍनिमिया संदर्भात गांभीर्य नसते. ऍनिमिया ग्रस्त रुग्णांना औषधोपचार इतकेच वैद्यकीय समुपदेशन करणे गरजेचे असते. यातूनच ऍनिमिया वरती सहज मात करू शकतो. यामुळे सरकारी अधिकारी हे संबंधित आरोग्य क्षेत्रातील शैक्षणिक पार्श्वभूमी असणारे असावेत.

प्रत्येक शाळेसाठी एक डॉक्टर नेमला पाहिजे. जेणेकरून वेळोवेळी मुलांची आरोग्य तपासणी होईल. आजार आढळून आल्यास विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना योग्य मार्गदर्शन करून योग्य ते उपचाराच्या बाबतीत माहिती देईल. तसेच विद्यार्थ्यांना समुपदेशनाची आवश्यकता लागल्यास ते तात्काळ करता येईल या दृष्टीने सरकारने विचार करून शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेला एक डॉक्टर असणे ही काळाची गरज आहे! तरच आपण सशक्त पिढी घडवू शकतो.

- होमिओपॅथ डॉ.वैष्णवी देवेंद्र किराड

Updated : 31 Dec 2022 3:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top