अखेर परिचारिकांच्या आजाराचं कारण सापडलं...
X
हल्ली धकाधकीचे जीवन एवढे वाढले आहे की, माणसाची अक्षरशः झोप नाहिशी झाली आहे. दवाखान्यात रूग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिकांमध्ये अपुऱ्या झोपेमुळे त्यावर शारीरिक परिणाम जास्त होतात हे आढळून आले आहे. यु.एस मधील एका विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणातून हे सिद्ध झाले.
संशोधकांच्या अहवालानुसार असे दिसून आले की, परिचारिकांना सगळ्यात कमी प्रमाणात झोप मिळते. खरंतर माणसाला किमान ७-८ तास झोप मिळणे आवश्यक आहे. परंतु परिचारिकांना शिफ्ट ड्यूटीमुळे फक्त ५-६ तास झोप मिळणे.त्यामुळे त्यांना विविध आजारांना तोंड द्यावे लागते. जसे की उदासीनता,लठ्ठपणा, निद्रानाश, कर्करोग, अस्वस्थता असे आजार मोठ्या संख्येने परिचारिकांमध्ये आढळून येतात. तेथील विद्यार्थांनी ऑनलाईन सर्वेक्षण पद्धतीमार्फत १,१६५ परिचारिकांचा अभ्यास केला. या सर्वेक्षणात परिचारिकांना शिफ्टविषयी आणि जीवनशैली विषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यातून परिचारिकांच्या आजाराचे कारण समोर आले. नेमकी कशी असते परिचारिकांची दिनचर्या जाणून घेऊयात परिचारिकांकडून वाचा...
•गिता गिरी-(अपोलो हॉस्पिटल, मुंबई)
रुग्णांची संख्या वाढल्यावर रात्रपाळीत जादा काम देखील करावे लागते.झोपेचं वेळापत्रक बिघडते.आम्हा बहुतांश लोकांची ७ तासांपेक्षाही कमी झोप होते.अक्षरश: झोपेचं खोबरं होतं.मूळात रूग्णांची संख्या अधिक आणि स्टाफ कमी ही स्थिती असल्यामुळे पुरेसा आराम देखील मिळत नाही.
•रिता रानवडे (एम.जी.एम हॉस्पिटल, वाशी)
नर्स म्हणजे डॉक्टर आणि रूग्णांच्या मध्ये असलेला दुवा. रूग्ण बरा होण्यामागे जितका डॉक्टरचा सहभाग असतो तितकाच नर्सचाही मोलाचा वाटा असतो. आजारी रूग्णासोबत सतत राहून आणि त्याची काळजी घेऊन या नर्स रूग्णसेवा करतात. हे खरं देखील असलं तरी अपुऱ्या झोपेमुळे आमचं स्वास्थ बिघडते. नर्सच्या कामांच्या तासांचा, सोयी-सुविधाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
•भारती नाईक ( सिव्हिल हॉस्पिटल , अलिबाग)
रूग्णांची सेवा करण्यासाठी अहोरात्र काम करावं लागतं.
कित्येकदा जेवायला सुध्दा वेळ मिळत नाही. कधी कधी रूग्णांकडूनही शाररिक, मानसिक त्रासाला त्यांना सामोरं जावं लागतं. अपूरी झोप आणि अवेळी खाणं यामुळे मानसिक तणाव, उदासीनता येते.एवढेच नाही तर कित्येकदा सुट्टी सुध्दा मिळत नाही.अशा विविध समस्यांवर मात करत काय करावं लागतं.