Home > हेल्थ > मासिक पाळी आणि सेक्स दरम्यान तीव्र वेदना हे एंडोमेट्रिओसिसचे लक्षण आहे का?

मासिक पाळी आणि सेक्स दरम्यान तीव्र वेदना हे एंडोमेट्रिओसिसचे लक्षण आहे का?

एंडोमेट्रिओसिस ही महिलांना भेडसावणारी समस्या आहे. या स्थितीत, गर्भाशयाच्या आत वाढणारी एंडोमेट्रियमची ऊती त्याच्या बाहेरही पसरू लागते. एंडोमेट्रिओसिसचा गर्भाशयावर वाईट परिणाम देखील होतो. नक्की हा आजार काय आहे पाहुयात..

मासिक पाळी आणि सेक्स दरम्यान तीव्र वेदना हे एंडोमेट्रिओसिसचे लक्षण आहे का?
X

एंडोमेट्रिओसिस हे मासिक पाळी दरम्यान अनेक समस्यांचे कारण असू शकते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगभरात सुमारे 190 दशलक्ष महिला या आजाराला बळी पडत आहेत. त्याच वेळी, द एंडोमेट्रिओसिस सोसायटी ऑफ इंडियाच्या मते, भारतातील सुमारे 2.5 दशलक्ष महिलांना हा आजार आहे.

एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय?

एंडोमेट्रिओसिस ही महिलांना भेडसावणारी समस्या आहे. या स्थितीत, गर्भाशयाच्या आत वाढणारी एंडोमेट्रियमची ऊती त्याच्या बाहेरही पसरू लागते. काहीवेळा ही ऊतक आतड्यांमध्ये आणि इतर पुनरुत्पादक अवयवांमध्ये देखील पसरते. एंडोमेट्रिओसिसचा गर्भाशयावर वाईट परिणाम होतो.

एंडोमेट्रिओसिसची लक्षणे काय आहेत..

मासिक पाळी आणि सेक्स दरम्यान पाठीच्या खालच्या भागात आणि ओटीपोटात वेदना होणे.

मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे

लघवी करताना वेदना (विशेषतः मासिक पाळी दरम्यान)

मासिक पाळीच्या दरम्यान थकवा, अतिसार, बद्धकोष्ठता

कधीकधी एंडोमेट्रिओसिस रोगामुळे जास्त वेदना होत नाहीत.

काही प्रकरणांमध्ये, महिलांमध्ये या आजाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.

एंडोमेट्रिओसिसचा महिलांच्या गगर्भधारनेशी संबंध आहे का?

एंडोमेट्रिओसिसमुळे महिलांना गर्भधारणा राहणे कठीण होऊ शकते. याचा परिणाम फॅलोपियन ट्यूब आणि अंडाशयांवर होतो, ज्यामुळे स्त्रियांमध्ये मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव आणि वेदना होऊ शकतात. यामध्ये महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापैकी अनेकांमध्ये वंध्यत्व ही समस्या बनते.

एंडोमेट्रिओसिस हार्मोनल वातावरणात बदल करून स्त्रियांच्या अंडाशयातील अंडी खराब करू शकते, ज्यामुळे पेल्विक क्षेत्रामध्ये जळजळ देखील होऊ शकते. हे वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले गेले आहे: स्टेज-1 (किमान), स्टेज-2 (सौम्य), स्टेज-3 (मध्यम) आणि स्टेज-4 (गंभीर).

स्टेज-4 महिलांना अधिक सावधगिरीची गरज आहे. या टप्प्यावर अनेक वेळा तिची गर्भधारणा होऊ शकते. स्टेज-4 मध्ये, महिलांच्या अंडाशयांना नुकसान होते आणि फॅलोपियन ट्यूब ब्लॉक होतात.

एंडोमेट्रिओसिससह आजारात गर्भधारणा होऊ शकते का?

स्टेज 1 आणि 2 मधील महिलांना जास्त उपचारांची आवश्यकता नसते. ते सामान्यपणे गर्भधारणा करू शकतात. जर एंडोमेट्रियमची ऊती शस्त्रक्रियेने काढून टाकली गेली तर गर्भधारणेची शक्यता वाढते. स्टेज 3 आणि 4 वर पोहोचल्यानंतर, नियमित उपचार आवश्यक बनतात.

एंडोमेट्रिओसिससह गर्भवती होण्याचे मार्ग

एंडोमेट्रिओसिस अंडाशयांना नुकसान पोहोचवते, म्हणून तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषध उपचार घेऊन शक्य होऊ शकते. इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF)- IVF हा गर्भधारणेचा पर्याय आहे. ज्या स्त्रिया नैसर्गिकरित्या गर्भवती होऊ शकत नाहीत त्या IVF उपचारांच्या मदतीने आई होऊ शकतात. हे प्रजनन तंत्रज्ञान आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयातून एक अंडी काढून शुक्राणूंद्वारे फलित केले जाते.


वरील माहिती ही या या आजाराची फारच तोतडी तोंडओळख आहे..आपल्याला अशी काही लक्षण असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..

Updated : 5 April 2022 2:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top