केवळ व्हॉट्सअपवर कुणीतरी सांगीतलंय म्हणून कोणताही काढा घेऊ नका...
X
कोणताही आजार आला की त्यावर उपाय सांगणारे अनेक मेसेज तुम्हाला व्हॉट्सअपवर येत असतील अगदी तुम्ही सुध्दा फॉरवर्ड करत असाल पण, ‘कुणी तरी व्हॉट्सअपवर सांगीलंय म्हणून उगाच कोणताही काढा करुन घेऊ नका, ओळखीतल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घऊनच त्याचं सेवन करा’ असा सल्ला शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी दिला आहे.
त्या म्हणाल्या की, ‘कोरोनाची साथ जशी वाढतेय त्याच बरोबर यावर प्रतिबंधात्मक उपाय काय करावेत हे सांगणाऱ्या मेसेजचं प्रमाण सुध्दा वाढतं आहे. आयुर्वेदीक उपचारांसाठी जे प्रयत्न सुरु आहेत ते स्थुत्य आहेत. परंतू, कुढलाही सर्दी खोकला नसताना रोज अमुक एका पध्दतीने काढे घेतले पाहिजेत अशी जेव्हा माहिती जेव्हा लोकांकडे येते तेव्हा तुमच्या ओळखीतील डॉक्टरांकडे त्याची खातरजमा करुन घ्यावी. केवळ व्हॉट्सअप फॉरवर्डच्या आधारावर असे काढ्यांचे प्रयोग करण कितपत योग्य आहे? याचा विचार करावा.’ असं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.