Home > हेल्थ > नो कंफ्यूजन : मिशन गर्भवती मातांचे लसीकरण

नो कंफ्यूजन : मिशन गर्भवती मातांचे लसीकरण

कोरोनाची लस घेताना गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी? ICMR कडून नव्या गाइडलाइन जारी

नो कंफ्यूजन : मिशन गर्भवती मातांचे लसीकरण
X

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून वाचण्याचा सध्यातरी प्रभावी उपाय म्हणजे लसिकरण हाच आहे. या लसिकरणाबाबत लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. म्हणजे जसं की, "लस खरच सुरक्षीत आहे का?" "गरोदर मातांनी लस घेतली तर चालेल का?" "लस गरोदर मातेने लस घेतल्यास त्याचा बाळावर परिणार होतो का?" अशा अनेक शंका आहेत.

सरकार व ICMR म्हणजेच Indian Council of Medical Research यांनी आधीच 'गर्भवती माताही कोविड प्रतिबंधाची लस घेवू शकतात' असं जाहिर केलं होतं. मात्र तरिसुध्दा लोकांच्या मनात शंका व भिती असल्याने आता मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत.

लसीमुळे कोविडपासून गर्भवती महिलांचे संरक्षण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी 28 जून रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये गर्भवती महिलांना लसी देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, "काही गर्भवती महिलांमधे कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत मात्र त्यांची प्रकृती खालावत असते. ज्याचा बाळावरही परिणाम होऊ शकतो. कोविड पासून स्वत: चा बचाव करण्यासाठी मातांनी त्यांनी सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे. यात कोविड प्रतिबंधीत लसीकरणाचा देखील समावेष आहे. म्हणूनच गर्भवती महिलांनी ही लस घ्यावी" असा सल्ला देण्यात आला आहे.

जर गर्भवती महिलेला करोना विषाणूची लागण झाली तर त्यातील ९० टक्के महिला रुग्णालयात दाखल न होता घरीच बऱ्या होतात. तर तिव्र लक्षणे असलेल्या महिलांना रुग्णालयात दाखल करावे लागते. कोविडमुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना गंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असेते, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Updated : 29 Jun 2021 2:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top