‘हर दिन शाम 7 बजे एक सुर में हनुमान चालिसा बोलो, हमें कोरोनासे मुक्ती मिलेगी’
X
जगभारत करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आपल्या देशात मात्र यावर ‘देसी जुगाड’ सुचवले जात आहेत. संशोधक यावरील औषध व लस शोधण्यासाठी मेहनत घेत असतानाच भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांनी करोनाला मूठमाती देण्याचा साधा-सोपा उपाय दिला आहे.त्यांनी करोना बरा होण्यासाठी हनुमान चालीसा म्हणण्याचा उपाय सुचवला आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी ट्विट करून हा उपाय सूचवला आहे.
“चला करोना महामारी संपवण्यासाठी आणि लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपण सगळे एक आध्यात्मिक प्रयत्न करूया. आजपासून २५ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता आपापल्या घरात हनुमान चालिसेचं पठण करावं. ५ ऑगस्टला रामलल्लाची आरती झाल्यानंतर आपापल्या घरात दिवा लावून याचा समारोप करावा”, असं प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/SadhviPragya_MP/status/1287008746904752128