थोडा मानसिक त्रास होतोय पण ‘ती’ खंबीर आहे... ती कोरोना वॉरियर 'सिस्टर'
X
तुमच्या आजुबाजूच्या परिसरात एखादा कोरोना बाधीत रुग्ण आढळला तर तुम्हा त्या परिसरात जाणं टाळता पण आरोग्य कर्मचारी त्यांच्या सोबत असतात त्यांच्या सोबत राहतात. अशाच कोरोना वॉरियर आहेत संजिवनी गवळी. संजिवनी या एक स्टाफ नर्स असून कोरोना वॉर्डमध्ये काम करतात.
या बाबत बोलताना संजिवनी गवळी म्हणाल्या की, “आम्ही कोरोना रुग्णांना आधार देण्याचं काम करतो. COVID रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने रुग्ण आधीच घाबरलेला असतो. अशा वेळी आम्ही पेशंटला सांगत असतो तुम्ही घाबरु नका, लवकर बरे व्हाल तुम्ही. अशातून अनेक रुग्ण बरे झाले आहेत. जे घरी जाऊन आमचे आभार मनतात. तेव्हा खुप बरं वाटतं.”
“पण आमची मानसिक स्थिती खुप खालावलेली आहे. आम्हाला निट जेवताही येत नाही. घरी वृध्द माणसं असल्याने घरी न जाता आम्ही इथं हॉस्पीटलमधेच झोपतो. घरचे भाबरलेले असतात. त्यामुळं आम्हाला त्यांनाही धिर द्वावा लागतो. याचा मानसिक त्रास होतो पण आम्ही खंबीर आहोत.” असं संजिवनी सांगतात.
तेव्हा संजिवनी गवळी यांच्या रुग्ण सेवेसाठी त्यांना max woman चा सलाम...
https://youtu.be/zwvC7xB-3mY