Home > हेल्थ > फक्त ‘५’ सोपे उपाय करा; महिन्याभरात स्लीम ट्रीम व्हा..

फक्त ‘५’ सोपे उपाय करा; महिन्याभरात स्लीम ट्रीम व्हा..

फक्त ‘५’ सोपे उपाय करा; महिन्याभरात स्लीम ट्रीम व्हा..
X

वजन कमी (Weight Lose) करणं जितकं कठीण आहे तितकच सोपही आहे. खरं तर कोणत्याही व्यक्तीचा आपल्या मनावर ताबा नसेल तर वजन कमी करणे अवघड आहे आणि दूसरं म्हणजे अशा व्यक्तींना आपल्या दररोजच्या सवयी बदलायच्या नसतात म्हणून वजन कमी करणे कठीण वाटते. थोडसे कमी मेहनतीचे उपाय करून किंवा जमलंच तर एखादी जादूची कांडी फिरवून वजन कमी झाली तर ठीक आहे अशी अनेकांची मनोमन इच्छा असते.

5 easy steps for Weight lose Courtesy : Social Media

कामातून वेळ मिळत नाही असही बऱ्याच जणांकडून सांगितलं जाते. अशा व्यक्तींसाठी आपण काहीच करू शकत नाही. पण ज्यांना खरचं वजन कमी करायचंय त्यांच्यासाठी काही सोपे उपाय नक्कीच आहेत.

5 easy steps for Weight lose Courtesy : Social Media

  • १६ तासाचं लॉकींग

आता लॉकींग म्हणजे नेमकं काय? लॉकींग म्हणजे उपवास किंवा डायटींग नाही. इथे तुम्हाला दोन्ही वेळेचं जेवण अगदी पोटभर करायचं आहे. या जेवणामध्ये कोणतीही पथ्यपाणी पाळण्याची आवश्यकता नाही. या प्रकारात फक्त आपल्याला दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाआधीचा नाश्ता करायचा नाही. या दरम्यान तुम्ही लिंबू पाणी, ग्रीन टी, ज्यूस किंवा नारळ पाणी पिऊ शकता. सकाळ आणि संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळेत १६ तासाचं लॉकींग पुर्ण होत आणि या पद्धतीचा तुम्हाला वजन कमी करण्यास खुपच फायदा होतो.

सूचना: आजारी व्यक्तींनी हा उपाय करू नये. कारण त्यांना सकाळी उठताच औषधं घेण्यापुर्वी अल्पोपहार करणं गरजेचं असतं.

5 easy steps for Weight lose Courtesy : Social Media

  • डाइट बदला (Diet)

आम्ही तुम्हाला कमी किंवा जास्त जेवण करायला सांगत नाही आहोत. फक्त जेवणाचे नियम बनवा आणि पाळा. कोणतीही एक ठराविक वेळ निश्चित करून त्याच वेळेला जेवण करा. आहारात भाज्या आणि फळांचा वापर जास्त करा. घास कमीत कमी ३० वेळा चावून खा.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, फळांचं पचन होण्यासाठी ३ तासांचा वेळ लागतो. भाज्यांचं पचन होण्यासाठी ६ तास लागतात. तर धान्याचं पचन होण्यासाठी १८ तासांचा कालावधी लागतो. मैदा आणि बेसन शरिरासाठी हानिहारक असतात. ज्वारी आणि मका पीठ शरिरासाठी उत्तम असते. साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर करणे. समुद्री मीठाऐवजी सैंधव मीठाचा (काळ्या मीठाचा) वापर करावा. तेलाऐवजी शुद्ध तुपाचा वापर अधिक करावा. आता तुम्हीच ठरवा फळ आणि भाज्यांचं सेवन करावं की धान्यांचं...

5 easy steps for Weight lose Courtesy : Social Media

  • डाइट फिक्स करा

जेवणाचं प्रमाण ठरवणे फार महत्त्वाचं असते. जसं की सकाळी आणि रात्री फक्त २५० ग्राम आहार करणं आवश्यक आहे. चवदार जेवण आहे म्हणून अगदी अर्धा किलो जेवण करणं योग्य नाही. जेवणाची मात्रा आणि वेळ दोन्हीही ठरलेलं असावं. भूक नसतानाही समोर येईल ते खाण्याची सवय मोडायला हवी तरच वजन कमी करणं सहज शक्य आहे.

5 easy steps for Weight lose Courtesy : Social Media

  • समतोल प्रमाणात पाण्याचं सेवन

पाणी आपल्या शरिरात जेवण पचनाचं मह्त्वाचं काम करते. जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर ते योग्य नाही किंवा जास्तही पित असाल तरी योग्य नाही. त्यामुळे पाणी पिण्याचा समतोल राखला पाहिजे. तुमच्या शरिराल पाण्याची गरज असेल तेव्हाच पाणी प्या आणि जितकी शरिराला गरज असेल तितकंच प्या.

पिण्याचं पाणी वजन कमी करण्यात मोठी मदत करते. जेवणाच्या एक तास आधी आणि जेवणानंतर एका तासाने पाणी पित जा. या मधील वेळेत पाणी पिऊ नका.

5 easy steps for Weight lose Courtesy : Social Media

  • हल्का फुल्का व्यायाम

जीम मध्ये जाऊन घाम गाळणं तुम्हाला शक्य नसलं तरी दररोज गतीने चालणं सहज शक्य आहे. शाळेत पीटीच्या तासाला केलेले व्यायाम प्रकार दररोज १० मिनिट तुम्ही नक्कीच करु शकता. ऑफीसला जाताना गतीने चालणे, मोबाईलवर बोलताना चालणे, जवळच्या अंतरावर जाण्यासाठी गाडीचा वापर टाळणे. अशा काही सवयी घालून घेतल्यास महिन्याभरातच तुम्ही स्वत:ला आरशात स्लीम झालेलं पाहू शकता.

Updated : 17 March 2020 4:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top