दरवेळी एखाद्या महिलेलाच का टार्गेट केलं जातं?

Update: 2020-09-04 15:52 GMT

काही दिवसांपुर्वी पुण्यातील १८०० रुपये मागणाऱ्या काकूंचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत जी मुल दिसत आहेत त्यांनी हा व्हिडीओ का व्हायरल केला? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. पण कदाचीत त्या मुलांनी आम्ही या काकूंना पैसे दिले होते पण त्यांना हिशोब कळत नव्हता हे सांगण्सायाठी हा व्हिडीओ पोस्ट केला असेल. पण अनेक जण या व्हिडीओवर हसले त्यांनी त्या काकूंची खिल्ली उडवली. पण तुम्ही त्या काकूंवर हसला नाहीत तर इथल्या व्यवस्थेवर हसलात. हि प्रतिक्रीया आहे भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांची.

#Justiceforkaku म्हणत तुम्ही व्हिडीओ शेअर केलात. पण आजही आपल्या देशाला बेटी बचाओ बेटी पढ़ाओ म्हणावं लागतं हि आपली शोकांतीका आहे. यात त्या काकूंची मेहनतीचा मोबदला मिळावा यासाठीची तळमळ कुणीच बघितली नाही. या काकूच काय आपल्याकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनाही ‘निर्मला काकू’ या नावाने लोक ट्रोल करतात.

यावर आता एकच उपाय आहे तो म्हणजे मुलगी जन्माला आली की तिचं स्वागत करा. जस मुलाला देता अगदी तसंच मुलीलाही शिक्षण द्या. असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/233287951411280/

Similar News