फसवणूक करणारा शिवभक्त असूच शकत नाही- स्वाती नखाते

Update: 2020-06-04 03:40 GMT

सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षय बोऱ्हाडे (Akshay Borhade) या मनोरुग्णांची सेवा करणाऱ्या तरुणास मारहाण झाल्याचं प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं आहे. जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर (SatyaShil Sherkar) व अक्षय बोऱ्हाडे यांच्यातील हा वाद होता. पण आता हे प्रकरण मिटलं असल्याचा व्हिडीओ अक्षय बोऱ्हाडे आणि सत्यशील शेरकर यांनी गळाभेट घेत सोशल मीडियावर शेअर केला होता.

संबंधित प्रकरण मिटल्यानंतर राज्यभरातून अक्षय बोऱ्हाडे यास पाठींबा देणाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रकरण मिटवल्यामुळे संशयाला वाव असल्याचं मत व्यक्त केलं जातंय. यावर सामाजिक कार्यकर्त्या एड. स्वाती नखाते (Swati Nakhate) यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करताना शिवाजी महाराजांच्या नावावर जर कोणी दुकान चालवत असेल तर ही गोष्ट खपवुन घेतली जाणार नाही असा इशारा दिला.

सोबतच, अक्षय बोऱ्हाडे याने त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. या प्रकरणात ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी या गोष्टीकडे कानाडोळा करुन चालणार नाही अशीही मागणी स्वाती नखाते यांनी ‘मॅक्सवूमन’च्या माध्यामातून केली आहे.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/246914206598807/?t=1063

“पुण्याचं काम करत असताना चार पापाच्या गोष्टी नाही खपवल्या जाणार. तुमच्यावर अन्याय होताना तुम्ही आवाज उठवता परंतू तुमच्या संस्थेवर, संघटनेवर आणि तुमच्या कामावर जर कोणी आक्षेप घेत असेल तर तुम्हाला त्यांचं स्पष्टीकरण देणं फार गरजेचं आहे.

तृप्ती देसाई (Trupti Desai) किंवा इतर सामाजिक कार्याकर्त्यांकडे काही ठोस पुरावे असतील तर यांचा वाद मिटला असला तरी तुमच्याकडे ते तसेच ठेवू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर जर कोणी दुकानं चालवत असतील तर ही पटणारी गोष्ट नाही. जर आज कोणाकडे पुरावे आहेत आणि त्यांनी त्याची कायदेशीररित्या कारवाई नाही केली, तर अशा गोष्टींना खतपाणी घालून भविष्यात खरंच बेकायदेशीर रॅकेट चालवलं गेल्यास काहीच करता येणार नाही.” असं स्वाती नखाते यांनी म्हटलंय.

Similar News