‘...तर आम्हाला मोफत उपचार मिळावा’ भारती हॉस्पिटलमधील परिचारीकांची मागणी

Update: 2020-07-28 23:10 GMT

‘कोरोना काळात आम्ही आमचं घरदार सोडून इथं काम करतोय पण, आमचं जे रुग्णालय व्यवस्थापन आहे ते कर्मचाऱ्यांची निट व्यवस्था करत नाहीय. घरी लहान मुलं, वृध्द व्यक्ती आहेत त्यामुळे आम्ही घरी सुध्दा जाऊ शकत नाही.’ ही व्यथा आहे सांगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या परिचारीकांची. त्यांनी रस्त्यावर उतरत निदर्शने करत हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधात काम बंद आंदोलन केले. भारती हॉस्पिटलमध्ये सध्या कोरोनासाठी राखीव वार्ड करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना परिचारीका म्हणाल्या की, ‘कोरोना वार्डात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ड्युटी संपल्यानतंर हॉस्पिटलमध्ये कॉरोटाइन न करता घरी पाठवण्यात येत. कामाची वेळ 6 तासावरून 8 तास करुन सुध्दा ती परत 6 तास करावी लागते. आमच्या पगातार वाढ करावी, रुग्णालयाचा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असेल तर अशा कर्मचाऱ्यांच्या कडून बील घेण्यात येऊ नये. एखादा कर्मचारी पॉझिटिव्ह असेल तर त्याच्या सुट्ट्या मांडल्या जात आहेत. पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे 50 लाखाचा विमा मिळावा.’ अशी मागणी या परिचारीकांनी केली आहे.

https://youtu.be/Vic3SdBKR_Y

Similar News