मदत नाही कर्तव्य, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या..

Update: 2020-05-25 11:28 GMT

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच नागरिक बेहाल झाले आहेत. पण या लॉडाऊनचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागतोय. आज आपल्या आजुबाजुला असे बरेच वयोवृद्ध जोडपी असतील ज्य़ांची मुलं विभक्त राहतात. या संकटकाळात अशा ज्येष्ठ नागरिकांना कोणताच आधार नाही. जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय.

हे ही वाचा..

ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा धोका जास्त आहे. मात्र घरात राहायचं म्हटलं तरी अन्नधान्य, औषधपाणी यासाठी बाहेर पडणं भाग आहे. लॉकडाऊनमुळे ज्येष्ठ व्यक्ती घराबाहेर पडू शकत नाही. अश्या आपल्या शेजारी राहणाऱ्या वृद्धांना माणुसकी दाखवण्याचे आवाहन करणारा हा व्हिडिओ निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी बनवला आहे जो सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे... नक्की पाहा.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/567849804149915/?t=0

 

Similar News