फक्त घर नाही, आज त्या चालवतायत गाड्यांचे पार्ट तयार करणारी कंपनी

Update: 2020-07-30 21:53 GMT

लॉकडाउनमुळे परप्रांतीय मजूर काम सोडून गेले. मात्र, देहूच्या तळवडेमधील उद्योजकाने महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या हातांना रोजगार मिळवून दिला. एवढंच नव्हे तर आता या महिला कंपनीत कायमस्वरूपी रूजू होणार आहेत. “आम्ही तीन ते चार महिने घरिच बसुन होतो. मुलं बाळं कशी जगवली आमचं आम्हाला माहिती पण, आता इथं काम सुरु केल्याने परिस्थिती थोडी सुधारतेय.” असं या महिला सांगतात.

ज्योतिबानगर येथील एका कंपनीत वाहनांचे सुट्टे भाग बनविणारी परम लघु उद्योग कंपनीत 3 महिन्यांपूर्वी या कंपनीत यंत्रांवर काम करणारे 60 कुशल, निमकुशल कारागीर निघून गेले. यातील बरेच कामगार उत्तर भारतीय होते. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर कंपनीला कामगारांची कमी भासली. तेव्हा कंपनीचे संचालक प्रकाश गोरे यांना कुणी तरी सांगीतले की, 'घरकाम करणाऱ्या महिलांच्या हाताला सध्या काम नाही. आपण त्यांना संधी द्यावी’. त्यानंतर गोरे यांनी वेळ न दवडता त्यांना प्रशिक्षण देवून कामावर घेण्याचा निर्णय घेतला. आज या महिला कंपनीत काम करुन संपुर्ण घर सांभाळत आहेत.

त्यामुळे संधी मिळाली तर त्याचं सोनं करता येतं हे या महिलांनी करून दाखवलं आहे.

https://youtu.be/Znr-PpgPK_0

Similar News