डॉ. बाबासाहेब आंबेडकर माझे प्रेरणास्थान – उषा जाधव

Update: 2020-04-14 00:15 GMT

प्रसिद्ध अभिनेत्री उषा जाधव मूळ कोल्हापूरची, परंतु शिक्षण आणि नोकरीसाठी ती पुण्यात आली. नोकरी करत असतांना अभिनय तिला साद घालू लागला.. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उषा जाधवने अभिनयात आपला आत्मा समर्पित केला. २०१२ मध्ये 'धग ' ह्या चित्रपटासाठी उषा जाधवला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि जरी ती मराठी भाषिक असली तरी हिंदीसह अन्य भाषांमधील सिनेमात दिसू लागली.

अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध कौन बनेगा करोडपती ह्या गेम शोच्या शो रीलमध्ये आणि अमिताभ सोबत 'भूतनाथ रिटर्न्स ', मधुर भांडारकरच्या 'ट्रॅफिक सिग्नल 'ह्या सिनेमातही तिची महत्वाची भूमिका होती. राम गोपाल वर्माच्या 'वीरप्पन 'मध्ये तिने उषा वीरप्पनच्या पत्नीची व्यक्तिरेखा साकारली होती. 'आरंभ ' 'कहानी देवसेना की 'असे टीव्ही शोज केलेत. आयसीआय, टाटा डोकोमो, फेव्हिकॉल असे जाहिरातपट देखील केलेत. हल्लीच उषा जाधवला 'पार्टिकल्स ' ह्या फिल्मसाठी 'इफि ' गोल्डन पिकॉक हा मानाचा आंतर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

ह्या गुणी अभिनेत्रीने तिचं दैवत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिचं प्रेरणास्थान का आहेत हे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलंय -

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/598852660756387/?t=37

 

 

Similar News