‘हा’ व्हिडीओ थाळीनाद करणाऱ्या बिनडोक माणसांसाठी- केतकी चितळे

Update: 2020-03-23 14:25 GMT

आपल्या बिनधास्त आणि वादग्रस्त व्हिडीओंमुळे कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे हिने आपला नवा व्हिडीओ पोस्ट करत जनता कर्फ्यूच्या वेळी मुळ संकल्पना समजून न घेता चुकीच्या पद्धतीने केलेल्या थाळीनाद आणि घंटानादाचा विरोध दर्शवला आहे. यावेळी तीने सदर व्हिडीओ थाळीनाद करणाऱ्या बिनडोक माणसांसाठी असल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे.

“आपले प्रधानमंत्री काय बोलतायत हे तरी पहिलं ऐका. त्या टाळ्या, शंखनाद आणि घंटानाद हे करोनासाठी नव्हतं. करोनाच्या विरोधात जे लढतायत, आपल्याला जे सुरक्षित ठेवतायत, स्वत: असुरक्षित राहून त्या व्यक्तींसाठी होत.” अशी आगपाखड अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या व्हिडीओ मधून केली आहे.

टाळ्या, शंखनाद आणि घंटानाद पोलिसांसाठी होत जे तुमच्यासारखी बिनडोक लोक अजूनही रस्त्यावर फिरतायत त्यांनी घरी राहावं म्हणून पोलिस आज त्यांना स्वत: बाहेर राहावं लागतंय, स्वत:चा जीव धोक्यात टाकावा लागतोय त्यांचे आभार मानन्यासाठी त्या टाळ्या होत्या. हॉस्पीटल मधील रुग्णांवर उपचार करता यावे म्हणून रिटायर झालेले डॉक्टर पुन्हा जातायत त्यांचे आभार मानन्यासाठी, आणि आपण आभार मानत होतो त्या साफसफाई कामगारांचे जे आजही येऊन आपल्या घरुन कचरा घेऊन जातायत. थोडा मेंदू वापरायला शिका अशी आशा बाळगते. अशी भावना केतकीने व्यक्त केली आहे.

https://youtu.be/-f1nXrBu5gI

Similar News