‘मुस्लिम असल्याने तो देशभक्त होऊ शकत नाही असं म्हणणं चुकीचं’ – शिक्षणमंत्री

Update: 2020-07-18 00:47 GMT

मुंबई - बालभारतीच्या माध्यमातून जी मराठी पुस्तक बनतात ज्या पुस्तकाची निर्मिती झाली प्रचलित कार्यपद्धतीनुसारच पुस्तकाची निर्मिती झाली आहे. यामध्ये प्रसिद्ध साहित्यीक, कवी, लेखक यांचे लेक असतात. ज्या पुस्तकातील लेखा संदर्भात वाद सुरू आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे हा लेख प्रसिद्ध साहित्यिक लेखक व संपादक यदुनाथ थत्ते यांनी लिहिलेल्या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, हे देशासाठी फासावर गेले असा उल्लेख या पुस्तकात आहे.

मात्र मला वाटतं सोलापूरचे चार हुतात्मे झालेले आहे त्यामध्ये कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, मल्लप्पा शेट्टी, किसान सरदारजी या सर्वांनीच देशासाठी बलिदान दिलेलं आहे. त्यामुळे कोणत्या एका व्यक्तीला तो मुस्लिम असल्यामुळे त्यांना अशाप्रकारे विरोध करणे हे चुकीचं आहे. असे मत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

https://youtu.be/euHlVqgTWyM

Similar News