‘मला सुषमा स्वराज यांची आठवण येते’ – सुप्रिया सुळे

Update: 2019-09-17 14:06 GMT

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी फेसबुकच्या माध्यमातुन जनतेशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी फेसबुकवरुन त्यांना आलेल्या ‘महाजनादेश यात्रा’ संबधित कॉमेंट्सवरही प्रतिसाद दिला. “सरकारने वाहतुकीचे नियम बदलले आणि ते नियम मोडल्यास त्या व्यक्तीवर दंड आकारण्यात येईल परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सध्या महाराष्ट्रात चालु असलेली महाजनादेश यात्रा यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाहतुकीचे नियम मोडले जात नाहीत का?” असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. “या यात्रेत वाहतुकीचे नियम मोडले जातात पण मा. मुख्यमंत्र्याना ‘सो खुन माफ’ आहेत. हे दडपशाहीचं सरकार आहे.” असे उत्तर त्यांनी यावेळी दिले.

सोबतच त्यांनी शेतकऱ्यांच्याही अनेक प्रश्नांवर भाष्य करताना दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांच्यासोबतची आपली आठवण सांगितली “या सरकारने खोटी कर्जमाफी केली असुन शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे. जेव्हा राष्ट्रवादीचं सरकार होत तेव्हा आम्ही सरसकट कर्जमाफी केली होती. परंतु हे सरकार फक्त कागदांवरची आकडेवारी सांगतं. शेतकऱ्यांचा विषय आला तर मला नेहमी सुषमा स्वराज यांची आठवण येते कारण अशाच एका चर्चेत त्या म्हणाल्या होत्या की, जेव्हा भूक लागते तेव्हा आकडेवारी नाही तर अन्नानचं पोट भरतं.”

 

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/2465909050397479/

 

Similar News