शबरीमाला मंदीराची दारे महिलांसाठी कधी उघडणार?

Update: 2019-11-14 10:16 GMT

केरळमधील शबरीमाला मंदीर हे जवळपास ८०० वर्षांपासून अस्तित्त्वात आहे. या मंदीराबद्दल असं सांगितलं जात की, भगवान आयप्पा हे ब्रह्मचारी होते. त्यामुळे या मंदीरात महिलांचा प्रवेश नाकरला जातो. खास करून १० ते ५० वर्षे वयोगटातील महिलांनाच मंदिर प्रवेश बंदी आहे. या वयोगटातील महिला मासिक पाळीमुळे शुद्ध राहू शकत नाहीत आणि अशा महिलांना मंदिरात प्रवेश दिला जाऊ शकत नाही, असा युक्तीवाद रुढीवादींकडून केला जातो.

या मंदीरात महिला प्रवेशाचा वादही दशकांपासून चालत आला आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. याबाबत आज कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र, महिलांना प्रवेश देण्याबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणखी लांबणीवर पडला आहे.

शबरीमाला मंदीरात महिलांच्या प्रवेशावर पुनर्विचार याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हे प्रकरण आता मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने हा लैंगिक भेदभाव असल्याचा निर्णय दिला होता. सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडून यावर निर्णय घेतला जाईल.

Similar News