Iphone चं नवं फिचर आहे भन्नाट! जाणून घ्या आपल्या iphone साठी उपलब्ध आहे का?

Update: 2021-11-04 10:34 GMT

हल्लीच iPhone चं 13वं व्हर्जन लॉंच झालं आहे. आणि iOS 14 मध्ये असे अनेक फीचर्स आहेत ज्यामुळे iphone युझर्स आनंदात आहेत. Iphone च्या इतिहासात पहिल्यांदाच फोनची पाठची बाजू देखील वापरता येणार आहे. आपल्या iPhone च्या पाठी असलेला सुप्रसिध्द अर्धा खाल्लेल्या सफरचंदाचा लोगोचा वापर करता येणार आहे. अनेक इतर कामांच्या एक्सेसिबिलिटी सुविधांना ट्रिगर करण्यासाठी लोगोचा वापर करता येणार आहे. या iOS 14 ने या फिचरला "बॅक टॅप" हे नाव दिले आहे.

"बॅक टॅप" फिचर ऍक्टीवेट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा...

स्टेप 1: सेटिंग मध्ये जा

स्टेप 2: पर्यायांमध्ये दिसत असलेल्या एक्सेसबिलिटी ला सिलेक्ट करा.

स्टेप 3: टच या पर्यायाला सिलेक्ट करा.

स्टेप 4: स्क्रोल करत खाली या आणि बॅक टॅप सिलेक्ट करा

ही कामं करता येणार….

इथे आपल्याला अनेक पर्याय मिळतील. आपण कोणत्याही गोष्टीला असाईन करू शकता. आपल्याला हव्या त्या प्रकारे आपण "बॅक टॅप" चा वापर करू शकता. उदाहरणार्थ होम स्क्रीन, लॉक स्क्रीन, वॉल्यूम कंट्रोल, स्क्रीनशॉट सारख्या प्रक्रियांसाठी डबल-टॅप किंवा ट्रिपल टॅप करून असाईन केले जाऊ शकते. या व्यतिरीक्त एक्सेसबिलिटी फीचर्स, जसे की, मॅग्निफायर, असिस्टिव टच, सिरी शॉर्टकट्स, व्हॉईस-ओव्हर या फिचर्साना देखील iPhone च्या बॅक लोगोने ऑपरेट करता येऊ शकतं

या iphones मध्ये वापरता येणार बॅक टॅप सुविधा

"बॅक टॅप" हा एक्सेसिबिलिटी फिचर्स वापरण्यासाठी एक योग्य पर्याय आहे. ही सुविधा फक्त ios14 च्या अपडेट नंतरच वापरता येणार आहे. एकंदरीत iphone 8 आणि त्यानंतरच्या सर्व iphones साठी बॅक टॅप ही सुविधा उपलब्ध असणार आहे. सप्टेंबर महिन्यात, Apple कंपनीने आपल्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी पंधरावं मह्तवाचं अपडेट आणलं आणि iOS 15 वापरात आणलं. कंपनीच्या म्हणण्यानूसार, iOS 15 सर्व iOS 14 व्हर्जन असलेल्या फोन्समध्ये वापरता येणार आहे.

Tags:    

Similar News