स्वभिमानी शेतकरी संघटनेच्या महिलेची मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक

Update: 2019-09-15 08:57 GMT

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा अकोला येथे असताना स्वभिमानी शेतकरी पक्षाच्या उपाध्यक्षा शर्मिला येवले यांनी फुग्यात शाई भरून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांवर फेकली.

अकोला येथील रोकडोबा मंदीराजवळील शेतात शर्मिला येवले लपून बसल्या होत्या. ज्यावेळी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा त्या परिसरातून रवाना होत होती तेव्हा, “सी एम गो बॅक” अशा घोषणा देत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर शाहीफेक केली.

मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर शाईफेक हल्ला करण्यामागे तीन मुख्य कारणे असल्याचे शर्मिला येवले यांनी सांगितले.

- मुख्यमंत्र्यानी भाजपाची उमेदवारी वैभव पिचड यांना सोडून इतर कोणालाही द्यावी ही एक मतदार म्हणून माफक अपेक्षा आहे.

- युवती आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. मुख्यमंत्री साहेबांनी यात लक्ष घालून योग्य ती अंमलबजावणी करावी.

- MPSC आणि UPSC परीक्षांचे महापोर्टल थांबवावे अशी मागणी चारशेहून अधिक मुलींनी मुख्यमंत्री कार्यालयासमोर केली आहे. महापोर्टल बंद करा अथवा आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या असे आवाहन करत रिझल्ट मध्ये होणारे गैरप्रकार रोखण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी या तीनही मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय द्यावा नाहीतर महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला असे रस्त्यावरून फिरू देणार नाही असा इशारा शर्मिला येवले यांनी केला आहे.

Full View

Similar News