‘ति’च्या प्राणाणिकपणानं केलं असं काही, तुम्ही देखील थक्क व्हाल

Update: 2019-09-08 14:55 GMT

कष्टाने काम करून आपले पोट भरणाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची कथा आपण नेहमी ऐकत असतो. अशीच एक कहानी आहे, पुण्यात राहणाऱ्या कस्तुराबाई गोखर हनवते यांची, कस्तुराबाई हनवते या महानगरपालिकेच्या सफाई कर्मचारी असून त्यांना नेमून दिलेल्या बिबेवाडी या परिसरामध्ये रोज सकाळी झाडणं काम करतात. एके सकाळी कोठारी ब्लॉग या रस्त्यावर सफाई करत असताना त्यांना एक प्लास्टिकची पिशवी रस्त्यावर पडलेली आढळली. त्यांनी ती कचरा समजून आपल्या जवळ असलेल्य़ा बकेटमध्ये टाकली. त्यावेळी कस्तुराबाई यांना धातू पडल्याचा आवाज जाणवल्याने त्यांनी ती पिशवी उघडून पाहिली असता त्यांना त्या पिशवीमध्ये दीड किलोचा गणपतीचा साज तसेच इतर चांदीची आभूषणं आढळली.

कस्तुराबाई हनवते यांनी तातडीने सफाई निरिक्षक सचिन पवार यांच्याशी संपर्क साधून ही बाब निदर्शनात आणली. त्या नंतर पवार यांनी पोलीसांशी संपर्क साधला आणि स्थानिक नगरसेविका मानसी देशपांडे यांच्यासह पवार, कस्तुराबाई यांनी चांदीची आभूषणे पोलीसांच्या हवाली केली. कस्तुराबाईंनी कोणताही मोह न ठेवता लाखभर रूपयांचे दागिने प्रमाणिकपणे पोलिसांच्या हवाली केल्याने बिबेवाडी पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या हस्ते कस्तुराबाई यांचा पुषपगुच्छ आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

Similar News