डॉ. पायल आत्महत्या प्रकरणी तीनही महिला डॉक्टर्सना अटक

Update: 2019-05-29 06:52 GMT

जातीयवादावरून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून पदव्युत्तर वैद्यकिय शिक्षणाकरिता मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये शिक्षण घेत असलेल्या आदिवासी समाजातील डॉ. पायल तडवी आत्महत्ये प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल या आरोपींना आज पहाटे अटक केलीय. यापैकी डॉ. भक्ती मेहेर हिला कालच ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान या तीनही संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

यातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. अंकिता खंडेलवाल हिनं अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र गुन्ह्यांमध्ये अजामीनपात्र कलमे लावण्यात आल्याने त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला आहे.

अशी झाली अटक…

डॉ. भक्ती मेहर ही अटकपूर्व जामिनासाठी मंगळवारी फोर्ट परिसरातील महानगर दंडाधिकारी न्यायालयात येणार असल्याची खबर पोलीसांना मिळाल्यावर परिसरात सापळा रचून तिला पकडले. तर डॉ. हेमा अहुजा हिला रात्री अंधेरी रेल्वे स्थानक परिसरातून अटक करण्यात आलं आहे.

या तिनही संशयित आरोपींवर अ‍ॅट्रॉसिटी, रँगिंगच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला होता. मात्र, या तिघीही फरार झाल्या होत्या.

Similar News