क्रिकेट क्षेत्रात मिताली राजचं 'राज'

Update: 2019-10-09 15:43 GMT

सध्या महिला क्रिकेट म्हटलं तर, पहिलं नाव येत ते मिताली राजचं. मिताली ही भारताच्या महिला एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट संघाची कर्णधार आहे. क्रिकेट क्षेत्रात तिने खूप विक्रम केले आहेत. पण सध्या तिच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. ते म्हणजे मितालीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची तब्बल 20 वर्षे पूर्ण केली आहेत.

सचिन तेंडुलकर २२ वर्ष ९१ दिवस, सनथ जयसूर्या २१ वर्ष १८४ दिवस, मियांदाद २० वर्ष २७५ दिवस असे सर्वाधिक काळ क्रिकेट खेळणाऱ्या महान खेळाडुंची ही नाव आहेत. आता मिताली राज २० वर्ष १०५ दिवस असा रेकॉर्ड करत, या महान खेळाडूंच्या यादीत सामील होणारी ही पहिलीच महिला क्रिकेटर ठरली आहे.

१९९९ मध्ये मितालीने या क्षेत्रात आपल्या करिअरची सुरवात केली होती आणि अजूनही तिची कारकीर्द सुरूच आहे. महिला क्रिकेट संघाला मिळालेलं मिताली एक वरदान आहे. म्हणून आज क्रिकेट क्षेत्रात मिताली राजचं 'राज' आहे.

Similar News