गाड्यांच्या किंमती महागणार..

Update: 2023-03-26 05:15 GMT

पुढील महिन्यापासून कार खरेदी करणे महाग होणार आहे. वाहन उद्योगाने BS-VI च्या दुसऱ्या टप्प्यातील कडक नियमांनुसार वाहने बनवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. यामुळे कंपन्यांनी 1 एप्रिलपासून कारच्या किमती 2-5% ने वाढवण्याची घोषणा केली आहे. मॉडेल आणि इंजिन क्षमतेनुसार कारच्या किमती 10-50 हजार रुपयांनी वाढतील. गाड्यांच्या किमती वाढण्यापाठी आणखीन काय करणे आहेत? नक्की कोणत्या गाड्यांच्या किंमतीत वाढ होणार आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा..

कंपन्यांनी दर वाढवण्याची घोषणा केली..

मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, होंडा कार्स, किया इंडिया आणि एमजी मोटर इंडिया सारख्या कंपन्या पुढील महिन्यापासून किमती वाढवणार आहेत. मारुतीने गुरुवारी दरवाढीची घोषणा केली, मात्र दरवाढ किती होणार हे सांगितले नाही. Honda Cars India 1 एप्रिलपासून एंट्री-लेव्हल कॉम्पॅक्ट सेडान Amaze च्या किमतीत 12 हजार रुपयांपर्यंत वाढ करेल. टाटा मोटर्सने पुढील महिन्यापासून वाहनांच्या किमती 5% पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

कारमधील या बदलांमुळे खर्च वाढला

BS-6 फेज-2 वाहनांना असे उपकरण बसवावे लागेल जे वाहन चालत असताना उत्सर्जन पातळीचे निरीक्षण करू शकेल.

हे उपकरण कारच्या कॅटॅलिटिक कन्व्हर्टर आणि ऑक्सिजन सेन्सर्सवर लक्ष ठेवेल. उत्सर्जन पातळी जास्त असल्यास चेतावणी देईल.

यासाठी कंपन्यांना गाड्यांच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये बदल करावे लागतील. यामध्ये सेमीकंडक्टर अपग्रेड देखील समाविष्ट आहे.

काही कंपन्यांनी यापूर्वीच किमतीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.

Kia India ने आधीच कारच्या किमती 2-3% ने वाढवल्या आहेत. Sonet, Seltos आणि Carens च्या अपडेटेड व्हेरियंटची किंमत आता अनुक्रमे 7.79 लाख, 10.89 लाख आणि 10.45 लाख रुपये आहे. एमजी मोटर इंडियानेही या महिन्याच्या सुरुवातीपासून आपल्या मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे एमजी ग्लोस्टर आणि हेक्टर (डिझेल) 60,000 रुपयांनी आणि हेक्टर (पेट्रोल) 40,000 रुपयांनी महागले आहे.

BS-6 स्टेज 2 नक्की काय प्रकार आहे?

नवीन नियम रिअल ड्रायव्हिंग एमिशन्स (RDE) म्हणून ओळखले जातात. यामध्ये वाहनांच्या उत्सर्जनाचे रिअल टाइम मॉनिटरिंग असेल.

Tags:    

Similar News