‘मी बांगड्या, कुंकु लावत नाही म्हणुन घटस्फोट होणं हे दुर्दैवी’

Update: 2020-07-02 23:11 GMT

तशी मी बिना टिकलीची फार कमी वेळा असते. म्हणूनच मंगळसुत्र खास काळ्या मण्यांचं किंवा पांढऱ्या मण्यांचं घालत नाही, कुठलही घालते जे साडीवर ड्रेस वर मँच होईल असं घालते. जोडवी पायात घालतेय पण यात नवरा जबरदस्ती करत नाही. कारण आमचं नात या गोष्टींना फारसं महत्त्व देत नाही. यामुळेच मला ‘जसं वाट्टेल तसं रहायचं’ हा निर्णय मी स्वतः घेते. यात मला सासु नसल्याने कदाचित जास्त सोप्पं झालं असं वाटतं. पण जर मला सासु असती तर कदाचित माझाही घटस्फोट झाला असता.

याचं कारण असं की, घरात नव्या सुनेला वळण लावण्याचे (अर्थात बंधनं घालण्याचे) काम सासु करत असते. अर्थात ती सासु या व्यवस्थेची वाहक म्हणुनच कार्यरत असते, फक्त तिला थोडासा मानपान असतो. तिच्यावरचा धाकधरारा जरासा कमी झालेला असतो एवढंच काय ते! म्हणुन मला असं वाटतं नव्या जोडप्यांमध्ये कुरबूर सुरू होण्याचं कारण घरात सासुचा जो वळण लावण्याचा प्रयत्न असतो तो सुनेला पटत नाही त्यात नवरा मग आईची वडंलांची बाजु घेतो आणि लोकं काय म्हणतील याला महत्व देतो. असं जेव्हा घडतं तेव्हा बायको घर सोडणं पसंद करते. मग यातुन 498 सारखे गुन्हे दाखल होणं ओघाने येतं. यातुनच मग 5 ते 6 वर्षे विभक्त राहील्यास साहजिकच न्यायालयात बाई म्हणु शकते की, मी नवऱ्याला नवरा मानत नाही म्हणुन मी बांगड्या कुंकु लावत नाही म्हणुन घटस्फोट होणं हे दुर्दैवी आहे.

लग्न झालं म्हणुन कुंकु, बांगड्या, मणीमंगळसुत्र(वैवाहिक निशाणी) घालण्याची जबरदस्ती करणं हे स्त्रियांना दुय्यम मानत पुरूषप्रधानता बळकट करणं आहे, अस मला वाटतं. बाकी सासु सासरे घरातील जेष्ठ नागरीकांना सांभाळण्याची जबाबदारी कर्तव्य हे मुलगा, सुन, मुलगी, जावयी, यांची पण आहे.

  • सत्यभामा सौदरमल, लेखिका सामाजिक कार्यकर्त्या आहेत...

Similar News