‘COVID मुळे मुंबईतील जवळपास 85 टक्के घरकामगार महिला बेरोजगार’

Update: 2020-06-29 03:49 GMT

COVID-19 अनेकांचे नोकरी व्यवसाय धोक्यात आले. कांहींना कंपन्यांनी कामावरुन कमी कलं. या बेरोजगार झालेल्या लोकांमध्ये एक घटक दुर्लक्षीत राहतो तो म्हणजे घर काम करणाऱ्या स्त्रीया. राज्यात घरकामगार महिलांची संख्या 30 लाखांच्या घरात आहे. तर एकट्या मुंबईमध्ये जवळजवळ 10 लाख घरकामगार महिला आहेत. यातील 85 टक्के महिला या बेरोजगार झाल्या आहे. अशा महिलांच्या मदतीसाठी “घरकामगार महिलांसाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे,” अशी मागणी भाजपच्या आमदार भारती लव्हेकर मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

Similar News