अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल फेऱ्या वाढणार

Update: 2020-06-29 01:52 GMT

मुंबईत लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सरकारने लोकल वाहतूक खुली केली. त्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या.

आता पश्चिम रेल्वेने या फेऱ्यांमध्ये आणखी 40 नवीन फेऱ्यांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन फेऱ्या आजपासून सुरू होत आहेत. त्यामुळे आता पश्चिम रेल्वे मार्गावर 162 ऐवजी 202 लोकल फेऱ्या सुरू होतील. यामध्ये बोरिवली ते चर्चगेट अप आणि डाऊन मार्गावर 20 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

हे ही वाचा

सुशांतसिंह च्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधल्या नेपोटीझम पोल खोल

सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या आणि ट्रोलर्सचा ऊत !

प्रकाशाची शलाका…!!

तर बोरिवली ते बोईसर दरम्यान डाऊन मार्गावर दोन लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. बोईसर-चर्चगेट दरम्यान अप मार्गावर 2 लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या असून विरार-बोरिवली मार्गावर 2 स्लो लोकल वाढवण्यात आल्या आहेत. तर विरार- चर्चगेट दरम्यान 14 फेऱ्या वाढवण्यात आल्या असून डाऊन दिशेला 8 तर अप दिशेला 6 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

Similar News