टॉपलेस होऊन सनबाथ घेणाऱ्या महिलांना पोलीसांचा दम, गृहमंत्र्यांनी पोलीसांना झापलं

Update: 2020-08-28 06:17 GMT

काही दिवसांपुर्वी फ्रान्सच्या सेंट-मेरी-ला-मेर या समुद्रकिनाऱ्यावर तीन महिला टॉपलेस होऊन सनबाथ घेत होत्या. या महिला धुम्रपानही करत होती. त्यावेळी तेथे पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबाने यासंदर्भात पोलीसांत तक्रार केली. या कुटुंबाला महिलांना असं अर्धनग्न अवस्थेत पाहणं योग्य वाटत नसल्याने त्यांनी तक्रार केली. या दोन्ही गटांमध्ये वाद होऊ नये म्हणून पोलिसांनी या महिलांजवळ जाऊन त्यांना टॉप घालण्याची आणि छाती झाकण्याची विनंती केली.

पोलीसांचं हे वागणं म्हणजे स्त्रीयांच्या स्वातंत्र्याचा अवमान असल्याचं म्हणत फ्रान्समधे याची चळवळ उभी राहिली. या संदर्भात फ्रान्सचे गृहमंत्री जेराल्ड डर्मेन यांनी महिलांच्या बाजूने आपले मत मांडले आहे. त्यांनी ‘महिलांना अशाप्रकारे कपडे घालायला सांगणे व्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने चुकीचं आहे.’ असं म्हणत ट्वीट द्वारे आपली प्रतिक्रीया दिली आहे.

Similar News