कामवाली बाई हिच ‘मुंबई’ची औकात आहे का ?

Update: 2020-05-02 04:53 GMT

ज्या मुंबईत आपण राहतोय त्याच मुंबईतील लाखो महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत. मात्र मुंबईची ओळख म्हणजे फक्त कामवाली बाई असल्याची उपरती ‘टाइम्स’ला सुचली आहे.

मुंबईच्या मराठमोळ्या बायका म्हणजे फक्त उच्चभ्रू वर्गातील लोकांच्या घरी धुणीभांडी करणारी कामवाली बाई अशा आशयाच्या मथळ्याखाली टाइम्स वृत्तपत्राने प्रकाशीत केलेल्या ‘Bom-बेब्ज आणि Mum-बाईज्’ या बची करकारिया यांच्या स्फुट लेखातून कामवाली बाई हिच मुंबईच्या महिलांची ओळख आहे अशी प्रतिमा मांडलीय.

एकिकडे लोकडाऊनमुळे घर कसं चालणार? मुलाबाळांची पोट कशी भरणार? लॉकडाऊन संपल्यावर आपल्याला पुन्हा कामावर घेतील ना? असे अनेक यक्षप्रश्न घरकाम करणाऱ्या महिलांसमोर आहेत. पण, मुंबईची कामवाली बाई घरी बसून आराम करतेय आणि आम्ही हाई प्रोफाइल कामं करणाऱ्या मुंबईच्या बेब्स स्वतःच्याच कुटुंबासाठी कशा राबतोय या भावना मांडण्यासाठी लेखिका आणि मुक्त पत्रकार बची करकारिया यांनी स्फुटलेखनाचा प्रपंच मांडला.

“आज आम्हाला कॅफे, मॉल्स आणि पार्टी यापेक्षाही सीताबाई, रमाबाई आणि लटक- मटक लता यांची जास्त आठवण येतेय. त्या त्यांच्या चाळीत आराम करतायत आणि आम्ही घरातील झाडू पोछा, भांडी आणि कपडे धुतोय.” असं हाई प्रोफाइल बेब्स च्या दृष्टीने प्रांजळ असलेलं मत मांडलय आणि ‘टाइम्स’ने ते प्रकाशित करत सर्व उच्चभ्रू लोकांपर्यंत प्रांजळपणे पोहोचवलं.

(सदर स्फुटलेख ३० एप्रिल रोजी प्रकाशित करण्यात आला आहे)

दरम्यान, संचारबंदीमुळे किर्तीकुमार यांनी प्रतिक्रिया फक्त सोशल मीडियावर मांडत आहे नाहीतर मनसेच्या पद्धतीने ‘टाइम्स’च्या ऑफिसमध्ये आणि करकारिया यांच्या घराबाहेर निषेध व्यक्त केला असता असं म्हटलंय. मुळात टाइम्स वृत्तसमुहाने अशा विचारांना प्रकाशित करणं हेच निषेधार्ह असल्याची टीका त्यांनी केली आहे.

https://www.facebook.com/100000216090812/posts/3559359050747930/?d=n

 

Similar News