COVID-19 ची बाधा झालेल्या डॉक्टरांना राखीव बेड का नाही?

Update: 2020-08-30 05:50 GMT

जन पळभर म्हणतील, RIP… RIP ! भा. रा. तांबेंची कविता आठवते?

'जन पळभर म्हणतील हाय हाय,

मी जाता राहील कार्य काय?'

'रामकृष्ण ही आले गेले

त्याहून जग का ओसची पडले?'

शेकडो डॉक्टर्स कोव्हिड 19 (covid) मुळे मृत्यूमुखी पडलेत, यातील 99 टक्के डॉक्टरांना (doctor) त्यांच्या पेशंट्स कडूनच इन्फेक्शन झाले होते. त्यांच्या फॅमिलीज कोणत्या अवस्थेतून जात असतील कल्पना ही करवत नाही. डॉक्टरच्या मृत्यूची बातमी आली की आपण काय करतो?

RIP टाइप करतो..

झालं….

आणि आपआपल्या विश्वात रमायला मोकळे होतो.

डॉक्टर मंडळींनी कितीही झोकून देऊन काम केलं, ,कितीही जीव वाचवले तरी स्वतः डॉक्टर अडचणीत असताना, मृत्यूशी झुंजत असताना त्यांना ऑक्सिजन बेडही मिळेना झालेत.

डॉक्टरांनो,

काय फरक पडतो हो समाजाला ?

एक गेला तर दुसरा येईल.

फरक पडतो आपल्या आप्तांना, मुलांना, जोडीदाराला...

पेशंटची सेवा करता करता मेलात तरी आपल्याला काय कोणी परमवीर चक्र वगैरे देणार नाहीये.

अत्यवस्थ रुग्णांना मृत्यूच्या दारातून खेचून काढलं तरी जाताना डॉक्टरना लुटारू म्हंटलं जातंय काही ठिकाणी, जसं काय त्यांना ऑक्सिजन फ्री मिळतोय, जसं काय स्टाफ फ्री मध्ये काम करतोय, जसं काय त्यांनी रात्रंदिवस राबूनही एक पैश्याच्याही नफ्याचा विचार करणं घोर पाप आहे.

या युद्धात या अज्ञात शत्रूला सामोरं जाणं ही भयानक अवघड गोष्ट आहे.

हे ही वाचा...

‘आरोग्याचा आधारस्तंभ’ max woman संडे स्पेशल बुलेटीन

आरोग्याचा आधारस्तंभ…

‘हर बच्चा सुरक्षित रहे’ अंगणवाडी सेविका बनवतायत चिमुकल्यांसाठी मास्क

गावपातळीवर असं चाललं आहे अंगणावाडी सेविकांचं काम…

नववा महीना असतानाही ‘ती’ करत होती कोरोनाबाबत जनजागृती

सुशांत सिंगच्या (sushant singh rajput ) सगळ्या गर्ल फ्रेंड्सची नावे तोंडपाठ असलेल्या जनतेला एका तरी कोव्हिड ड्युटी मध्ये मरण पावलेल्या डॉक्टरांचं नाव माहीत आहे का? विचारा. किती जणांनी आपल्या फॅमिली डॉक्टरना भेटून त्यांना N95,PPE भेट दिलेत विचारा.

पेशंट्स साठी कितीही केलं तरी कमीच असतं, सध्या पेशंट्सना इमर्जन्सी सेवा देऊन इतर काही एंटरटेन न केलेलं बरं. सध्या घरीच आहोत, मुलांना सुट्ट्याच आहेत तर मूल बंद होण्याचं ऑपरेशन करून टाका ना, पिशवी काढून टाका ना मॅडम,' असंही विचारणारे पेशन्ट आहेत.

जागतिक साथीतच कित्येक जणांना प्रेगनंट होण्याची घाई आहे. तर कित्येकांना कित्येक वर्षे रखडलेली पोटाची सोनोग्राफी करून घ्यायला आत्ता उसंत मिळालीय.

अरे, पण डॉक्टरांनी जीव का धोक्यात घालायचा असलं नॉन इमर्जन्सी वर्क करून? कोव्हिड ड्युटी करायची, नॉन कोव्हिड वर्कही करायचं, सतत सेवेशी हजर राहायचं डॉक्टरांनी. आणि यातून स्वतः इन्फेकट झाले तर, मात्र त्यांच्यासाठी कुठेही विशेष राखीव बेड नाहीत.

सतत आपल्याला इन्फेक्शन झालं, बेड मिळालं नाही तर? अशी डोक्यावर टांगती तलवार घेऊनच काम करायचं. आपल्याला काही झालं तर, जन खरंच पळभरच हाय हाय म्हणणार आहेत. दोस्तांनो, आत्यंतिक काळजी घेऊनच काम करीत राहू!

डॉ. साधना पवार

Similar News