- स्वाती काळे या महिला पोलीस रणरागिणीचा होणार सन्मान..
- 'लाल सिंग चड्ढा' ऑनलाइन लीक, तरीही पहिल्या दिवशी केली इतकी कमाई..
- अनोख्या रक्षाबंधनाचा हृदयस्पर्शी सोहळा...
- ''अर्रर्रर्रर्रर्रर्र.., काही इज्जत आहे की नाही..'' शिवसेना नेत्याचा एकनाथ शिंदेंना टोला
- Comedian Raju Srivastava : कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक..
- चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना प्रतिउत्तर...
- चित्रा वाघ यांचा भाजपने वापर करून घेतला का?
- यूएस कॉन्सुल जनरल म्हणून माईक हॅन्की मुंबईत रुजू
- अपक्ष व शिंदे गटात नाराजी?
- Lawasa Case : सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटूंबियांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका..

आरोग्याचा आधारस्तंभ...
X
जरा विचार करा... या कोराना काळात तुमच्या घरातील व्यक्ती आजारी आहे. तुम्ही त्या व्यक्तीला डॉक्टरकडे नेण्यासाठी धडपड करताय. बाहेर खुप पाऊस आहे आणि लॉकडाउनमुळे गाड्यासुध्दा नाहीत. अशावेळी तुम्ही काय कराल?...
घाबरलात ना...? पण काळजी करु नका कारण तुमची काळजी घेण्याकरीता आरोग्य सेविका खंबीर आहेत. तुम्हाला माहितीसुध्दा नसेल त्या स्वत:च्या जिवावर उदार होऊन तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घेण्यासाठी थेट तुमच्या इथं येतायत.
अशाच आरोग्य सेविकांची आम्ही तुम्हाला ओळख करुन देणार आहोत. या आरोग्य सेविका आहेत हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील आरोग्य केंद्राच्या कर्मचारी. या आरोग्य सेविका भर पावसातही नदीच्या पात्रातून चालत जाऊन लोकांची सेवा करत आहेत.
हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार या आरोग्य केंद्राअंतर्गत नालेगाव हे आरोग्य उपकेंद्र येतं. नालेगाव आरोग्य उपकेंद्रामार्फत नालेगाव, बेरूळा, पेरजाबाद या गावांना आरोग्य सुविधा पुरविली जाते. परंतु नालेगाव आणि पेरजाबाद या दोन गावांच्या मधून पूर्णा नदी वाहते. नदीवर कोणताही पूल नसल्यामुळे पेरजाबादहून नालेगावला यायचे असल्यास किंवा नालेगाव वरून पेरजाबादला जायचे असल्यास जवळाबाजार औंढा गोळेगाव साळणा असा 30 किलोमीटरहून अधिक प्रवास करावा लागतो आणि नदीच्या पाण्यातून गेले तर हे अंतर केवळ पाचशे ते सातशे मीटर आहे.
लॉकडाउनमुळे एकतर गाड्यांची सोय नाही. त्यात हे 30 किलोमीटरचे अंतर पार करणे म्हणजे दिवस वाया घालवण्यासारखे आहे. जर या आरोग्य सेविका वेळेत आपल्या कामाच्या ठिकाणी पोहचू शकल्या नाहीत तर ग्रामीण भागातील अनेकांचा जीव टांगणीला लागतो , कारण त्यांना लागणारी औषध याच ‘नर्स बाई’ त्यांना देत असतात. त्यामुळेच या सेविका नदीत उतरूनच प्रवास करतात. याच नदीच्या वरील भागात येलदरी सिद्धेश्वर अशी मोठी धरणं आहेत.
आम्ही या संदर्भात आरोग्य सेविका आशाताई कडू यांच्याशी बोललो तर त्या म्हणाल्या की, ‘सध्या कोरोना महामारी सुरू आहे अशावेळी कर्तव्य हे सर्वात मोठे असते. ग्रामीण भागात साधी सर्दी जरी झाली तरी भयंकर घाबरत आहेत. त्यामुळे वेळच्यावेळी उपचारासाठी पोहोचणे गरजेचे झाले आहे. नदीतून येता जाताना नागरिक मदत करायचे त्यामुळे नदी ही कधी अडथळा झाली नाही.” असे त्या सांगतात.
https://youtu.be/YG5rYUhviVM