‘ए काळे, ए काळ्या’, अशा हाकांमागच्या मानसिक विकृतीचे काय करणार?

Update: 2020-07-04 12:23 GMT

फक्त ‘फेअर’ हा शब्द गाळून काय होतय? लोकांच्या मनातला काळ्या, सावळ्या रंगाबद्दलचा जो कमीपणाचा मळ साचलाय, तो कसा गाळणार?

गोरीच मुलगी हवी, ह्या लग्नाच्या अपेक्षेमधल्या ‘महत्वाच्या’ मुद्द्याचे काय करणार? ‘गोरीपान बायको मिळाली असती मला किंवा कसला काळा नवरा पदरात पडलाय,’ ह्या विचारांचे काय करणार? ‘ताई गोरी आहे, तिला कोणीही पसंद करेल. तुझ्या लग्नासाठी मात्र आम्हांला वहाणा झिजवायला लागणार’, या मानसिकतेचे काय करणार? ‘तू गोरी आहेस, देखणी आहेस, म्हणून तुला पटपट प्रमोशन्स मिळतात.

गुड जिन्स ओन्ली, यात तुझे स्किल्स काय’, या वाक्यामागे लपलेल्या कातडीच्या रंगाबद्दलच्या कॉंम्प्लेक्सचे काय करणार? ‘गोरी सून मिळाली असती तर नातवंडे पण गोरी झाली असती’, या गोरेपणा बद्दलच्या प्रेमाचे काय करणार? ‘ए काळे, ए काळ्या’, अशा हाकांमागच्या मानसिक विकृतीचे काय करणार?

हे ही वाचा

अखेर ‘फेअर अँड लवली’ इतिहासजमा

हे वागणे ‘फेअर’ नव्हे

काहीही नाही करू शकत नं आपण! मानसिकता मूळापासून बदलणं इतक सोप्प थोडीचे.. जे खपत ते विकायच, हा बिझनेस रूल आहे.. “जे फेअर असत तेच लव्हली असत”, हि तुमचीच मानसिकता.. जी त्यांनी वापरून पैसे कमावले.. थोडक्यात ‘मेलॅनिन’ आणि ‘मानसिकतेने’ मालामाल केलं कंपन्यांना..

Similar News