बांधकाम कामगारांच्या पत्नीस प्रसूतीसाठी 20 हजार दिले जातात,कसे वाचा ?

Update: 2023-02-06 13:04 GMT

सामान्यतः गरोदरपणात स्त्रियांची विशेष काळजी घेतली जाते .सकस आहार ,निरोगी राहणीमान ,पोषक वातावरण आणि बऱ्याच आरोग्याला लाभदायक गोष्टींची काळजी घेतली जाते.पण बांधकाम कामगार महिला यांचा विचार केला असता या सर्वच गोष्टींची कमतरता त्यांना भासताना दिसते. त्यांची प्रसूतीदरम्यान घ्यावयाची काळजी तसेच त्यासाठी होणारा खर्च यामुळे अनेकदा या महिलांना अनेक संकटाना समोर जावं लागत . अशाच महिलांसाठी काही योजना राबविल्या जातात .


Full View

त्यांना नैसर्गिक आणि शस्त्रक्रिया प्रसूतीसाठी आर्थिक साहाय्य्य दिले जाते. यामद्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पत्नीस दोन जीवित अपत्यांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. नैसर्गिक प्रसूतीसाठी १५००० रुपये तर शस्त्रक्रियेद्वारे होणाऱ्या प्रसूतीसाठी २०००० रुपये आर्थिक मदत केली जाते .

यासाठी काही कदगपत्रे आवश्यक आहेत

1) नोंदणी पावती

2)मंडळाचे ओळखपत्र

3)बँकेचे पासबुक

4)रेशन कार्ड प्रसूतीबाबत सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रसूती प्रमाणपत्र

5)या कागदपत्रांच्या सर्व सत्यप्रती स्वयं साक्षांकित करणं आवश्यक आहे.

जिल्हा सहाय्य्क कामगार अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा लागतो तसेच या योजनेची अधिक माहिती mahabocw.in या वेबसाईटवर जाणून घेऊ शकतो .

Tags:    

Similar News