बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिली ते दहावीपर्यंत मिळते आर्थिक मदत

Update: 2023-02-06 13:33 GMT

 बांधकाम कामगारांची मुले म्हंटल तर आठवतात ते विटा सिमेंट आणि वाळूच्या ढिगाऱ्यासोबत मळकटलेली कपडे आणि त्यासोबत निराश निरागस चेहरे . दिशाहीन भविष्य आणि आशाहीन अस्तित्व घेऊन जगणारे चिमुकले चेहरे .या चेहऱ्यांवर नवी उमेद जागी करणारी हि योजना...

चला तर जाणून घेऊया, योजना नक्की आहे तरी काय?

बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिलीपासून सातवी पर्यंत आर्थिक मदत केली जाते . पण यासाठी त्या विद्यार्थ्याची किंवा विद्यार्थिनीची ७५% किंवा त्यापेक्षा अधिक उपस्थिती असणं आवश्यक आहे. या योजनेचा लाभ दोन पाल्यांना मिळतो. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत दरवर्षी २५०० रुपये तर आठवी ते दहावी पर्यंत दरवर्षी ५००० रुपये अशी आर्थिक मदत दिली जाते.

यासाठी आवश्यक कागदपत्रे लागतात.

1)नोंदणी पावती

2)मंडळाचे ओळखपत्र

3)बँकेचे पासबुक ,किंवा रेंट अग्रीमेंट

4)शाळेत शिकत असल्याबाबतचा बोनाफाईड दाखल्याची मूळ प्रत

5) ७५ % हजेरीबाबत शाळेचा दाखला किंवा हजेरी पत्रक

6)रेशन कार्ड.बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची ओळख करून नव्या जगाशी नातं जोडू पाहणारी हि योजना आहे.

तसेच या योजनेची अधिक माहिती mahabocw.in या वेबसाईटवर आपण जाणून घेऊ शकतो.

Tags:    

Similar News