औरंगाबाद ग्रामीण पोलीसांनी रोखला 'बालविवाह'

Update: 2021-04-05 07:00 GMT

तालुक्यातील नारळा येथील अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना यश आले. पोलिसांनी समुपदेशन केल्यानंतर विवाह न करण्याचा निर्णय मुलीच्या कुटुंबाकडून घेण्यात आला. पोलिसांनी तशी लेखी जवाब नोंदवून मुलीला कुटुंबियांच्या ताब्यात दिलं.

नांदेड जिल्ह्यातील 15 वर्षीय मुलीचा मुंबईतील एका मुलासोबत 5 एप्रिल रोजी विवाह पार पडणार असल्याची माहिती बीडच्या सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौदरमल यांना मिळाली होती. याबाबत त्यांनी खात्री करत मुलीच्या घराचा पत्ता काढला असता,मुलगी आणि त्याचे कुटुंब औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील नारळा येते गेले असल्याचं कळले. तसेच लग्न सुद्धा तिथंच पार पडणार असल्याची माहिती सत्यभामा यांना मिळाली होती.

त्यामुळे औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना याबाबतची माहिती सत्यभामा यांनी दिली.तसेच बालविवाह रोखण्याची विनंती केली.त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार आणि पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक पोलिसांना सूचना देत कारवाईचे आदेश दिले.

माहिती मिळताच पैठण पोलिसांनी लगेच कारवाई करत मुलीच्या घराचा शोध घेत कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी वर-वधुंच्या वयाचा दाखला मागितला,असता वधूचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असल्याचं उघडकीस आले. त्यामुळे तिचा विवाह लावता येणार नाही, अशी समज पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना दिली. १८ वर्षे पूर्ण झाल्यावरच मुलीचे लग्न करू,असे पोलिसांनी त्यांच्याकडून लेखी घेतले.

Tags:    

Similar News