बीड गर्भाशय प्रकरणी शासनाने केली समिती गठित

Update: 2019-06-18 08:53 GMT

बीड जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्रक्रिया करुन महिलां गर्भपिशवी काढणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध शासन काय कारवाई करणार, असा प्रश्न विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार नीलम गो-हे आणि विद्या चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर तज्ज्ञांची राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. समितीचा अहवाल मिळाल्यानंतर दोषींना कठोर शासन केलं जाईल, असं आश्वासन सार्वजनिक आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. बीड जिल्ह्यातील ९९ खासगी रूग्णालयांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ३ वर्षांमध्ये ४६०५ महिलांवर गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच प्रसूतीचं प्रमाण कमी झाल्याचं दिसून आलंय, असंही शिंदे यांनी सांगितलं.

Similar News