कोरोना प्रतिबंधक लसीची जगातील पहिली चाचणी एका महिला शास्त्रज्ञावर

Update: 2020-04-25 08:33 GMT

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या लसीवर संशोधन करत असलेल्या ब्रिटनमधील शास्त्रज्ञांचे प्रयत्न आता अंतिम टप्प्यात आले आहेत. कोरोनाच्या लसीची मानवी चाचणी शुक्रवारपासून ऑक्सफर्ड विद्यापीठात सुरू करण्यात आली आहे. या लसीची पहिली चाचणी इलिसा ग्रॅनोटो या महिला शास्त्रज्ञावर करण्यात आली आहे. इलिसा या मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत.

या लसीच्या चाचणीसाठी ८०० जणांचा गट बनवण्यात आला आहे. या गटात एलिसा यांचा समावेश आहे. जगभरात सध्या १५० ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस शोधण्याचे काम चालले आहे. पण यात ब्रिटन आणि जर्मनी यांनी मानवी चाचणीपर्यंतचा टप्पा गाठला आहे. अपायकारक नसलेल्या चिम्पांझी व्हायरसपासून ही लस बनवण्यात आली आहे.

दरम्यान, या लसीची चाचणी सुरू झाली असली तरी ती प्रत्यक्ष कोरोनावर प्रतिबंधक म्हणून वापरात कधी येईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे ब्रिटनच्या सरकारने किमान पुढच्या वर्षापर्यंत सोशल डिस्टन्सिंगचे पालन नागरिकांना करावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Similar News