आता ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचाराचा कालावधी आणि खर्च कमी होणार

Update: 2020-08-27 07:40 GMT

भारत एक असा देश आहे या देशात कॅन्सरग्रस्त गरीब रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर उपचार आणि औषधांचा खर्च प्रचंड असल्याने अनेकांना ते परवडत नाही. त्यासाठी टाटा मेमोरियल हॉस्पिटलकडे असे रुग्ण धाव घेतात. आता हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी केलेल्या संशोधनामुळे रुग्णांच्या उपचाराच्या कालावधीत आणि उपचारावरील खर्चात प्रचंड बचत होणार आहे.

टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे आणि टाटा मेमोरिअलचे डॉ. सुदीप गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली संशोधनाअंती हा अभ्यास अहवाल तयार करण्यात आला. यासाठी डॉ. सीमा गुल्ला आणि साधना कनन यांनीही साहाय्य केले. टाटा मेमोरिअल रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे म्हणाले, १२ महिन्यांच्या कालावधीप्रमाणे दोन ते तीन महिन्यांत त्याच दर्जाचे उपचार देणे शक्य आहे.

भारतीय महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाण देशात हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू आणि दिल्लीत स्तनाच्या कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण आहे. स्तनाच्या कर्करोग रुग्णांची संख्या २ लाखांवर जाण्याची शक्यता असून, सध्या हे प्रमाण १४.८ टक्के एवढे आहे. दरवर्षी देशात दीड लाखाहून अधिक स्तनाच्या कर्करुग्णांचे निदान होते. त्यातील सुमारे ४५ हजार रुग्णांना औषधोपचारांचा लाभ मिळतो.

Similar News