Home > W-फॅक्टर > "महिलांनी सर्व बंधनं झुगारून स्वयं विकासासाठी पुढं यावं"

"महिलांनी सर्व बंधनं झुगारून स्वयं विकासासाठी पुढं यावं"

महिला सरपंचाने केलं गावातील महिलांना आवाहन

महिलांनी सर्व बंधनं झुगारून स्वयं विकासासाठी पुढं यावं
X

दहा दिवसांपुर्वीच संपुर्ण जगभरात महिला दिन साजरा करण्यात आला. तसाच तो रत्नागिरी जिल्ह्यातील कुडली या गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 3 मध्येही करण्यात आला. मात्र या गावातील महिला दिन चर्चेला येतोय तो गावच्या सरपंच चैतनी शेट्ये यांच्या आवाहानामुळे.

चैतनी शेट्ये यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगण्याबरोबरच महिलांचा कुटुंबाच्याच नव्हे तर देशाच्या जडणघडणीत असलेला महत्त्वाचा वाटा त्यांनी अनेक उदाहरणाद्वारे पटवून दिला. तसेच आपल्या गावातील महिलांनीही सर्व बंधने झुगारून स्वयं विकासासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

'नेतृत्व करणाऱ्या महिला' ही या वर्षीची जागतीक महिला दिनाची थीम होती. त्यातच जानेवारी महिन्यांत झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये यावेळी महिला संदस्यांची संख्या वाढल्याचं निवडणूक आयोगाने सांगीतलं. त्यामुळे ग्रामीण भागातही 'महिला नेतृत्व' पुढे येत असल्याने तिथेही महिला दिन साजरा करण्यात आला.

Updated : 20 March 2021 5:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top