Home > W-फॅक्टर > ग्राम पंचायत निवडणूक निकाल : बायकोने काढली नवऱ्याची मिरवणूक

ग्राम पंचायत निवडणूक निकाल : बायकोने काढली नवऱ्याची मिरवणूक

बायको रॉक्स नवरा शॉक

ग्राम पंचायत निवडणूक निकाल : बायकोने काढली नवऱ्याची मिरवणूक
X

पुणे जिल्ह्यतील पाळू ग्रामपंचायतीमध्ये जाखमाता देवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागावर वर्चस्व मिळवलं. या घवघवीत यशा मागे महिलांचा मोठा मोलाचा वाटा होता. त्यामुळं, विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवारांच्या पत्नीनं आपल्या पतीच्या विजयासाठी त्यांना खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढत आनंद साजरा केला.

संतोष शंकर गुरव यांनी 221 मते मिळवत विरोधी उमेदवारावर 44 मतांनी विजय मिळविला. त्यामुळे त्यांच्या पत्नी रेणुका गुरव यांनी आनंदोत्सव साजरा करताना पतीराजांना थेट खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढली.

यंदा कोरोनामुळे जास्त कार्यकर्त्यांना एकत्र जमण्यास बंदी असल्यानं त्या कायद्याच पालन करताना मिरवणुकीचा जल्लोष करण्यासाठी कार्यकर्त्यांपासून 'फिजिकल डिस्टन्स' पाळताना रेणुकां यांनी स्वत:च पतीराजांना खांद्यावर घेत आनंद साजरा केला.

Updated : 19 Jan 2021 5:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top