केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. पण या अर्थसंकल्पात महिलांसाठी काय तरतूद आहे हा प्रश्न सध्या विचारला जातोय. त्यामुळे आम्ही सांगतोय या अर्थसंकल्पात महिलांना काय मिळालं.
1) सर्व क्षेत्रात नाईट शिफ्टमध्ये काम करण्यास परवानगी
महिलांचा सर्वांगीण व्हावा हा हेतू समोर ठेवून महिलांना नाईट शिफ्टमध्येसुद्धा काम करता येणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी सांगीतलं. विशेष म्हणजे यासाठी सुरक्षाही प्रदान केली जाईल असं देखील अर्थमंत्री म्हणाल्या.
2) चहा मळ्यांत काम करणाऱ्या महिला व मुलांसाठी 1 हजार कोटींची तरतूद
आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये चहाचे मोठ्या प्रमाणात मळे आहेत. या मळ्यांत मोठ्या प्रमाणात महिला काम करतात. या महिलांच्या कल्याणासाठी 1,000 कोटींची तरतूद केल्याचे निर्मला सितारमण यांनी सांगीतलं.
3) महिलांना नविन उद्योग सुरु करण्यासाठी विशेष तरतूद
2021 या वर्षाचा अर्थसंकल्प जाहिर करण्याआधी महिलांना कोणताही स्टार्टप व्यवसाय सुरु करयचा असल्यास त्या प्रोजेक्टच्या एकूण कॉस्ट पैकी 25% रक्कम व्यवसायीकाकडे असणे बंधनकारक होतं. मात्र या अर्थसंकल्पात महिला महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही रक्कम 25 टक्क्यावरुन आता 15 टक्के इतकी करण्यात आली आहे.