हवामान कार्यकर्त्या दिशा रवी यांना पटियाला हाउस कोर्टाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. दिल्ली पोलीसांनी न्यायालयाकडे पाच दिवसांचा रिमांड मागितला होता. पण न्यायालयाने एक दिवसाच्या पोलीस कोठडीला परवानगी दिली आहे. दिशाला कडक सुरक्षेत पटीयाला न्यायालयात दंडाधिकारी पंकज शर्मा यांच्यासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने काही काळ निर्णय राखुन ठेवल्यावर अखेर एक दिवसाच्या पोलीस कोठडीला परवानगी दिली.
दरम्यान, मंगळवारी 23 तारखेला दिशा रवी यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
Updated : 22 Feb 2021 3:30 PM GMT
Next Story