पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : व्हायरल ऑडिओ क्लिपमधाला तो आवाज पूजाचा नाही?
"ऑडिओ क्लिपमधाला तो आवाज पूजाचा नाहीय, माझ्या पोरीचं संजय राठोडसोबत नाव जोडू नका. आमची बदनामी थांबवा नाहीतर मलाच आत्महत्या करावी लागेल" असं पूजा चव्हाणच्या वडिलांनी म्हटलं आहे.
X
सध्या राज्यात चर्चेचा विषय बनलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर पूजाच्या वडिलांनी पहिल्यांदाच प्रतिक्रीया दिली आहे. "ऑडिओ क्लिपमधाला तो आवाज पूजाचा नाहीय, माझ्या पोरीचं संजय राठोडसोबत नाव जोडू नका. आमची बदनामी थांबवा नाहीतर मलाच आत्महत्या करावी लागेल" पूजाच्या वडिलांनी दिलेल्या या प्रतिक्रीयेमुळे संपुर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.
माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रीयेत पूजाचे वडिल म्हणाले की, "कोणासोबत तरी माझ्या मुलीचं नाव जोडून मुद्दामून आमची बदनामी केली जातेय. ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत, त्यातील आवाज पूजाचा नाही. संजय राठोड पूजाच्या वडिलांसारखे आहेत. त्यामुळे आता आमची बदनामी थांबवा."
"माझी मुलगी तर गेली ना, माझं काय आहे? तिची आई बेशुद्ध आहे. कोणाला काय सांगावं काहीच कळत नाही. तुम्ही आता आमची बदनामी थांबवा नाहीतर मीच आत्महत्या करेल" असं पूजाचे वडिल लहू चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पूजाने पोल्ट्री व्यवसायासाठी 25 ते 30 लाखांचं कर्ज काढलं होतं. पोल्ट्री व्यवसाय सुरू होताच कोरोना आला. आणि त्यातून आलेल्या आर्थीक संकटातून पूजाने आत्महत्या केल्याचं पूजाच्या वडिलांनी सांगीतलं.