Home > W-फॅक्टर > अखेर रंजन गोगोई यांच्यावरील लैंगिक अत्याचाराचा 'चॅप्टर क्लोज'

अखेर रंजन गोगोई यांच्यावरील लैंगिक अत्याचाराचा 'चॅप्टर क्लोज'

न्यायालयाच्या या निर्णयावर संबंधीत महिलेने निराशा व्यक्त केली आहे

अखेर रंजन गोगोई यांच्यावरील लैंगिक अत्याचाराचा चॅप्टर क्लोज
X

माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावरील लैंगिक अत्याचाराची केस सर्वोच्च न्यायालयाने अखेर बंद केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने बदनामीची हेतू असल्याची शक्यता आपल्या निकालात म्हटलं आहे. मागील दोन वर्ष या प्रकरणाची चौकशी सुरु होती.

सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांच्या समितीने गोगोई यांना निर्दोष मुक्त केले असल्याने हा खटला बंद करत आहे, त्यात आता इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डही मिळण्याची शक्यता कमी झाली आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. महत्वाची बाब म्हणजे कोर्टानेच हे प्रकरण स्वतःच 'स्यू मोटो' स्वरुपात दाखल करून घेतलं होतं. आता हे प्रकरण कोर्टानेच रद्दबातल करून टाकलं आहे.

काय आहे नेमकं प्रकरण..?

सर्वोच्च न्यायालयात ज्युनीयर कोर्ट असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या एका 35 वर्षीय महिलेने 2019 साली रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. या आरोपानंतर त्या महिलेला, तिच्या पतीला व त्यांच्या कुटुंबाला बरेच नुकसान सहन करावे लागले. त्या महिलेला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. नंतर त्यांचे दिल्ली पोलिसात असलेल्या पतीला व मेव्हण्याला नोकरीतून निलंबित करण्यात आले होते.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

Updated : 19 Feb 2021 10:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top