Home > W-फॅक्टर > देशात पहिल्यांदाच महिलेला होणार फाशीची शिक्षा

देशात पहिल्यांदाच महिलेला होणार फाशीची शिक्षा

स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच दिली जातेय महिलेला फाशी, काय आहे प्रकरण?

देशात पहिल्यांदाच महिलेला होणार फाशीची शिक्षा
X

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. फाशी दिल्या जाणाऱ्या महिलेचं नाव शबनम असं असून तिला उत्तर प्रदेशच्या जेलमध्ये फाशी देण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण?

शबनम ने २००८ साली आपल्या प्रियकरासोबत नात्यातल्या 7 जणांचा कुऱ्हाडीने खून केला होता. या प्रकरणात तिला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळला…

शबनम ला फाशीची शिक्षा झाल्यानंतर तिने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. हा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला आहे.

कुठं दिली जाणार फाशी?

शबनमला उत्तरप्रदेशच्या मथुरा जेलमध्ये फाशी देण्यात येणार आहे. या जेलमध्ये महिलांसाठी 150 वर्षापुर्वी फाशी घर तयार करण्यात आलं आहे. मात्र, आत्तापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून कोणत्याही महिलेला फाशी देण्यात आलेली नाही.

शबनला फाशी देणारा पवन जल्लाद कोण आहे…?

देशभरात गाजलेल्या निर्भया प्रकरणातील गुन्हेगारांना फाशी देणारा पवन जल्लाद शबनम ला फाशी देणार आहे. त्याने फाशी गृहाची पाहणी केली आहे. शबनम ला फाशी देण्यासाठी बिहारच्या बक्सरमधून फाशीचा दोर मागवण्यात आला आहे.

कधी दिली जाणार फाशी?

शबनमला डेथ वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर फाशी देण्यात येणार आहे.

Updated : 2021-02-18T12:30:44+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top