शाब्बास नियती! जेठालालच्या मुलीचं केस काळे न करणं खूप काही सांगून जातं....
X
बॉलिवूड मध्ये सध्या लग्नाचा सीजन सुरू आहे. आधी राजकूमार राव मग कतरीना –विकी, त्यानंतर अंकीता – विकी, आणि आता सुप्रसिध्द अभिनेते दिलीप जोशी यांची कन्या नियती जोशी हिचं देखील लग्न झालं. हो बरोबर ओळखलंत. तारक मेहत का उलटा चष्मा वाले जेठालाल त्यांच्याच मुलीचं लग्न झालं. चर्चा तिच्या लग्नाची नाहिये तर चर्चा तिने घेतलेल्या एका महत्वपूर्ण निर्णयाबद्दल सुरू आहे.
आता लग्न म्हटलं तर नवऱ्या मुलीच्या हातावर मेहंदी, चेहऱ्यावर मेकअप, केस रंगवणं हे आलंच. पण हेच जर एखाद्या मुलीने स्वतःच्य़ा लग्नात नाही केलं तर? आपण म्हणाल असं कुठे असतं? अशी मुलगी शोधूनही सापडणार नाही पण दिलीप जोशींच्या मुलीने अगदी हेच केलंय. आपण हे फोटो बारकाईने पाहिलेत तर त्यांच्या मुलीचे केस पांढरेच दिसत आहेत. तिचं स्वतःचं लग्न होतं. ती ते केस काळे करू शकली असती पण तीने तसं केलं नाही आणि हेच तिचं महत्वाचं पाऊल ठरलं.
नियतीने तिचा प्रियकर यशोवर्धन मिश्रा याच्यासोबत लग्न केलं. यशोवर्धन मिश्रा हा पेशाने बॉलिवूडमध्ये कथा लेखक असून तो प्रसिध्द गीतकार अशोक मिश्रा यांचा मुलगा आहे. महत्वाचं म्हणजे कौतूक हे यशोवर्धनचं देखील व्हायला हवं कारण त्याने नियतीला ती आहे तसं स्विकारलं आणि सर्वांसमोर एक आदर्श उभा केला. शेवटी प्रेम ते प्रेमच असतं म्हणा! चार वर्षांची लव्ह स्टोरी अशा शुल्लक गोष्टींना थोडीच महत्व देणार होती. नियती आणि यशोवर्धन दोघांनाही नव्या आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा! आपण पाहत होतात मॅक्स वूमन धन्यवाद!