Home > W-फॅक्टर > pooja chavan suicide case : "कर्जाबाबत पूजाला कोणताही त्रास दिलेला नाही" बॅंकेचे स्पष्टीकरण

pooja chavan suicide case : "कर्जाबाबत पूजाला कोणताही त्रास दिलेला नाही" बॅंकेचे स्पष्टीकरण

pooja chavan suicide case : कर्जाबाबत पूजाला कोणताही त्रास दिलेला नाही बॅंकेचे स्पष्टीकरण
X

"पूजावर बॅंकेचे कर्ज होते. या कर्जाच्या चिंतेतून पूजाने आत्महत्या केली" पूजा चव्हाणच्या वडिलांनी दिलेल्या या प्रतिक्रीयेवर आता पूजाला कर्ज देणाऱ्या खुलासा केला आहे. कर्जाबाबत पूजाला कोणताही त्रास दिलेला नाही असं बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगीतलं.

"पूजा चव्हाण यांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत 13 लाख 50 हजाराचे कर्ज मंजूर झाले होते. परळी येथील गांधी मार्केट मधील स्टेट बँकेने हे कर्ज दिले होते. आतापर्यंत 35 हजार 500 रुपयाप्रमाणे 12 हफ्ते पूजाने भरले आहेत. या कर्जासाठी बँकेकडून कसलीही विचारणा झालेली नाही." असं बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगीतलं. मात्र त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला.

दरम्यान, बँकेचं कर्ज असल्याने पूजा तणावात होती. बँकेकडून सतत कर्जाबाबत विचारणा होत होती. त्यामुळेच पूजा ही नेहमी मानसिक तणावात होती. यामुळंचं तिला चक्कर आली आणि खाली पडून तिचा मृत्यू झाला असावा. असा दावा मयत पूजा चव्हानच्या वडिलांनी काल केला होता.

Updated : 16 Feb 2021 6:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top