Home > W-फॅक्टर > "खासदार महुआ मोईत्रा सिंगल आहेत का?"

"खासदार महुआ मोईत्रा सिंगल आहेत का?"

लोक काय सर्च करतील सांगता येत नाही..

खासदार महुआ मोईत्रा सिंगल आहेत का?
X

नेटकरी कधी काय सर्च करतील सांगता येत नाही. लोक सध्या गुगलवर खासदार महुआ मोईत्रा यांची वैयक्तीक माहिती सर्च करत आहेत. यात "mahua moitra husband" "mahua moitra age" "mahua moitra single" असे कि-वर्ड वापरले जात आहेत.


आपल्या आक्रमक भाषणांमुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या तृणमुल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आपल्या वैयक्तीच आयुष्यातही तितक्याच स्टायलीश आहेत. महुआ मोईत्रा यांचा जन्म 1975 साली कोलकाता येथे झाला. आश्चर्यकारकबाब म्हणजे महुआ 46 वर्षांच्या असून वयाच्या या टप्प्यावरही त्या अविवाहित आहेत.

खासदार महुआ मोईत्रा राजकारणात येण्यापूर्वी बँकर होत्या. अमेरिकेतून पदवी घेतल्यानंतर त्यांनी परदेशात अनेक बँकांमध्ये काम केले आहे. त्यांनी 2009 साली कॉंग्रेस पक्षापासून राजकारणाची सुरूवात केली. पुढे वर्षभरतच त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, महुआ मोईत्रा या पश्चिम बंगालच्या कृष्णानगर लोकसभा मतदारसंघातील तृणमूल कॉंग्रेसचे खासदार आहेत. त्या सोशल मीडियामध्येही बर्याशपैकी लोकप्रिय आहेत. महुआ मोईत्रा यांनी संसदेत आपल्या भाषणात मांडलेले मुद्दे नेटकऱ्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत.

Updated : 25 Feb 2021 8:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top